Goa Assembly Session: पंढरपूर वारी करणाऱ्यांना आर्थिक मदत द्या; आमदार सरदेसाई

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: हज समितीला सरकार मदत करते त्या धर्तीवर पंढरपूर वारी करणाऱ्यांनाही सरकारने मदत करावी
Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: हज समितीला सरकार मदत करते त्या धर्तीवर पंढरपूर वारी करणाऱ्यांनाही सरकारने मदत करावी
Vijai SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

पंढरपूरला पायी वारी करणाऱ्यांना सरकारने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी शून्य तासाला केली. अशी वारी करणारे २१ समूह राज्यात असल्याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.

ते म्‍हणाले, हज समितीला सरकार मदत करते त्या धर्तीवर पंढरपूर वारी करणाऱ्यांनाही सरकारने मदत करावी. पंढरपूरला पोचल्यानंतर परत येण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था सरकारने करावी. २५० किलोमीटर पायी हे वारकरी चालत जातात. बेळगाव - कोल्हापूर मार्गावर प्रसाधनगृहे नसतानाही हे सारे अडचण सोसून जात असतात. त्यांना सरकारने मदत करण्याची गरज आहे.

डिचोलीचे आमदार चंद्रकांत शेट्ये म्हणाले, डिचोलीच्या नव्या बगलमार्गावरील पथदीप नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे अंधारात अपघात होण्याची शक्यता वाढते. सरकारने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची नियुक्तीही हवी.

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: हज समितीला सरकार मदत करते त्या धर्तीवर पंढरपूर वारी करणाऱ्यांनाही सरकारने मदत करावी
Vijai Sardesai: ....म्‍हणून टीका बंद होणार नाही; पर्यटनमंत्री खवंटे यांच्या मिठीवरती प्रतिक्रिया

...तर सर्वांनाच द्यावी लागेल मदत

समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, केवळ पंढरपूरलाच नव्हे, तर शिर्डीलाही वारी केली जाते. त्यामुळे आर्थिक मदत द्यायची झाल्यास सर्वांनाच द्यावी लागेल. त्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, अयोध्येलाही वारी केली गेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com