MLA Krishna Salkar Dainik Gomantak
गोवा

MLA Krishna Salkar : ‘जादा सोपो शुल्क भरू; पण एसजीपीडीएने वीज बिल भरावे’

मार्केटमधील किरकोळ मासळी विक्रेत्यांनी आपण जादा सोपो शुल्क भरण्यास राजी असल्याचे स्पष्ट केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

salcete news : काही दिवसांपुर्वी एसजीपीडीएचे अध्यक्ष व वास्कोचे आमदार कृष्णा उर्फ दाजी साळकर यांनी एसजीपीडीए किरकोळ मासळी मार्केटची पाहणी केली व नंतर त्यांनी नाले स्वच्छ करण्याचे काम हातात घेतले.

जर मासळी विक्रेते जादा सोपो शुल्क भरण्यास तयार असतील तर स्वच्छता, वीज व पाणी पुरवठ्याची जबाबदारी तसेच साधन सुविधा वाढवून एसजीपीडीए देऊ शकते. त्याला अनुसरून मार्केटमधील किरकोळ मासळी विक्रेत्यांनी आपण जादा सोपो शुल्क भरण्यास राजी असल्याचे स्पष्ट केले आहे.

पण एसजीपीडीएने पाणी व वीज बिल भरावे लागेल. त्याच प्रमाणे स्वच्छता व काही सुविधा वाढवून देण्याची जबाबदारी एसजीपीडीएची असेल. काही दिवस मार्केटमधील वीज पुरवठा खंडित केला होता. मासळी विक्रेत्यांनी एक लाख रुपये वीज बिल भरल्याने सोमवारी वीज पुरवठा पूर्ववत झाला. मासळी विक्रेती बोस्त्यांव हिने सांगितले की, आम्ही ५० रुपये सोपो शुल्क भरायला तयार आहोत.

मात्र, एसजीपीडीएने वीज व पाणी बिले भरावी व स्वच्छता राखण्याची जबाबदारी घ्यावी. मार्केटमध्ये प्रत्येक मासळी विक्रेत्याला वीज मीटर द्यावा. पूर्वी होते. पण मार्केटच्या नूतनीकरणाच्या वेळी ते काढण्यात आले ते अजून बसविले नाहीत,असे बोस्त्यांव यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT