Salcete News : गायकाला रियाझ अत्‍यंत गरजेचा

अतुल दाते : मडगावात काव्यमैफलीसह वर्धापनदिन उत्साहात साजरा
Salcete News
Salcete NewsGomantak digital team
Published on
Updated on

सासष्टी : माझे वडील अरुण दाते यांनी १९६२ साली रेडिओवर पहिले गाणे गायिले व ते आजही लोकांच्या कानात घुमत आहे. गायकाला रियाझ अत्यंत महत्वाचा असतो, असे प्रसिद्ध गायक स्व. अरुण दाते यांचे सुपुत्र संगीत निर्माता, दिग्दर्शक अतुल दाते यांनी सांगितले. २१६ वी काव्यमैफल व काव्यमैफलीचा १८ वा वर्धापनदिन शनिवार ता. १७ जून रोजी मडगाव रवींद्र भवनच्या कृष्णकक्षात उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतुल दाते बोलत होते. लता मंगेशकर यांना देवाने रियाझ करूनच पाठविले असे आपले वडील म्हणायचे. गाण्यासाठी, नाटकासाठी, वक्तव्यासाठी आवाज वेगवेगळा असावा लागतो. गाण्यासाठी खास आवाजाची गरज असते. माझा आवाज गाण्यासाठी योग्य नाही हे लहानपणीच कळल्यावर मी गाणे सोडून दिले.

माझे वडील अरुण दाते यांचे गोवा हे आवडते ठिकाण होते. ते सलग ५३ वर्षे गात राहिले. त्यांनी केवळ ११५ गाणी गायिली व सर्वच्या सर्व गाणी लोकप्रिय झाली, असे अतुल दाते यांनी काव्यमैफलीच्या सर्वेसर्वा कविता बोरकर यांनी घेतलेल्या मुलाखतीच्या वेळी सांगितले.

Salcete News
...तर 3 linear projects रद्द करा ; युरी आलेमाव | Goa News

काव्यमैफलीच्या चाहत्यांनी स्वागतगीत सादर केले. कविता बोरकर यांनी स्वागत करताना मनोगत व्यक्त केले. काव्यमैफल नवोदित कवींना प्रेरणा देणारी ठरली असे त्या म्हणाल्या. ज्येष्ठ साहित्यिक पंढरीनाथ लोटलीकर, कवी प्रसाद सावंत यांच्या हस्ते काव्यमैफलीचे जनक स्व. अशोक बोरकर यांच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण करण्‍यात आला.

Salcete News
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील इंधनाच्या किमती स्थिर; वाचा आजचे दर

अतुल दाते यांच्या मुलाखतीनंतर झालेल्या काव्यमैफलीत अनेकांनी कविता सादर केल्या. सूत्रसंचालन स्मिता कारे आणि उषा कामत यांनी केले. रजनी रायकर यांनी आभार मानले.परीक्षकांना नावापुरतेच असते स्‍थान झी टीव्हीवरील सारेगमप, अंताक्षरी या कार्यक्रमांची संकल्पना माझी असून हे कार्यक्रम आम्ही सुरू केले. पण काही वर्षांनी या कार्यक्रमाअंतर्गत जी वेगळी पद्धत सुरू झाली.

Salcete News
Goa Congress : त्रस्‍त जनताच भाजपला घरी पाठवणार : काँग्रेस

ती बदलणे शक्य नसल्याचे कळल्यावर आम्ही या कार्यक्रमांना सोडचिठ्ठी देऊन स्वत:ची कंपनी सुरू केली. गायन कार्यक्रमातील जे परीक्षक असतात ते नावापुरतेच असतात. पहिले दहा स्पर्धक निवडण्यापर्यंत परीक्षकांचे वर्चस्व चालते. त्यानंतर मात्र चॅनलचे मार्केटिंग, सेल्स, डिस्ट्रीब्युशन विभागच सर्व काही ठरवतो, असे अतुल दाते यांनी सांगितले.

Salcete News
Goa Revolution Day 2023: क्रांतिदिनाचा इतिहास आता अकरावीच्या पुस्तकातही, शासकीय सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची माहिती

काव्यमैफलीत वेगवेगळ्या कवींचे कार्यक्रम सादर व्हावेत. जुन्या कवींच्या कवितांना चाल लावून त्यांचे सादरीकरण झाल्यास पुढील पिढीला त्या कवींचे, गाणाऱ्यांचे महत्त्‍व उमजेल. मात्र मराठी भावगीत जीवंत राहायला पाहिजे. गायकाने रियाझ कायम करावा. रियाझाची तालीम असेल तर चांगले गायक घडतील. नवोदित गायकांनी हे तत्त्व पाळावे.

- अतुल दाते, संगीत निर्माता व दिग्दर्शक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com