Salcete News : तळेबांध व मुंगुल भागाची पाहणी; अयोग्य नियोजनामुळेच पूरस्थिती: व्हेंझी व्हिएगस

पूरस्थितीला सरकारचे अयोग्य नियोजन कारण असल्याचा आरोप आमदार व्हिएगस यांनी केला.
Venzy Viegas on Dhirio News | Goa Aam Aadmi Party News Updates
Venzy Viegas on Dhirio News | Goa Aam Aadmi Party News UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

Salcete News : बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यानी उपजिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम व जलस्रोत खात्याचे अधिकारी व आपत्कालीनन व्यवस्थापन समितीचे अधिकारी यांच्या समवेत तळेबांध व मुंगुल भागाची पाहणी करून या भागात पावसामुळे पाण्याची उंची वाढत असल्याने भीती व्यक्त केली. या पूरस्थितीला सरकारचे अयोग्य नियोजन कारण असल्याचा आरोप आमदार व्हिएगस यांनी केला.

गेल्या कित्येक काळापासून पश्र्चिम बगल रस्ता स्टिल्टवर बांधावा अशी आम्ही मागणी करीत आहोत. मात्र, सरकार त्यावर विचार करीत नाही. शिवाय एसजीपीडीएच्या घाऊक मासळी मार्केटजवळ जो साकव (लहान पूल) आहे, तेथील बांध बांधकाम करून वर काढण्यात आला आहे. तिथेच काही तरी तांत्रिक दोष आहे. त्यामुळे ही पूरस्थिती निर्माण झाल्याचे व्हिएगस म्हणाले. त्यामुळे पश्र्चिम बगल रस्ता स्टिल्टवर बांधण्याची मागणी वाढणार आहे.

Venzy Viegas on Dhirio News | Goa Aam Aadmi Party News Updates
Salcete News : राय गावात होणार हरितक्रांती; शेतजमिनीबरोबरच पर्यटकांनाही आकर्षित करण्यासाठी उपयुक्त

सरकारला पूरस्थितीची जाणीव आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम व जलस्त्रोत खात्यामार्फत बांधला जात आहे. त्यामुळे ज्या काही अडचणी आहेत त्या त्यांनी पाहायच्या आहेत. जर काही बिकट स्थिती उद्‍भवली किंवी पाण्याची उंची आणखी वाढली, तर जिल्हाधिकारी कचेरी लोकांना तेथून हलविण्याचे काम करील.

- उदय प्रभुदेसाई, उपजिल्हाधिकारी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com