SGPDA Market Fishermens Demand  Dainik Gomantak
गोवा

SOPO Tax: ‘सोपो’च्या नावाखाली लूटमार थांबवा! स्थानिक रापणकरांचा संताप, SGPDA अध्यक्षांची घेतली भेट

Daji Salkar: राज्यातील पारंपरिक मच्छीमार, बोट मालक यांच्याकडून एसजीपीडीए अध्यक्ष दाजी साळकर यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर मच्छीमारांच्या मार्केटमध्ये येत असलेल्या समस्या मांडल्या.

Sameer Panditrao

मडगाव: एसजीपीडीए मार्केटमध्ये स्थानिक मच्छीमार आणि रापणकरांची सोपो कराच्या नावाखाली जी लूटमार चालू आहे ती बंद करा, अशी मागणी मच्छीमार नेत्यांनी एसजीपीडीए अध्यक्ष दाजी साळकर यांच्याकडे आज केली.

मात्र स्थानिक मच्छीमारांना कराची रक्कम अर्धी असून रापणकरांना विक्रीसाठी पुरेसा वेळ दिला जातो. त्यातही आणखी दर कमी करण्याचा व वेळेची मागणी पुढील बैठकीत चर्चेला घेण्यात येईल. तसेच सोपोची निविदा खुली असून त्यात सहभागी होण्यास सांगितले असल्याचे साळकर यांनी सांगितले.

राज्यातील पारंपरिक मच्छीमार, बोट मालक यांच्याकडून एसजीपीडीए अध्यक्ष दाजी साळकर यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर मच्छीमारांच्या मार्केटमध्ये येत असलेल्या समस्या मांडल्या. माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ आले होते. यानंतर साव्हियो डिसिल्वा यांनी स्थानिक मच्छीमारांकडून जादा कराची रक्कम आकारणी केली जाते. मार्केटमध्ये एसजीपीडीएचे कर्मचारी व मार्केटबाहेर पालिकेकडून करासाठी तगादा लावतात. कराची रक्कम कमी करण्यासह आवश्यक सुविधांची मागणी केली.

ओलांसिओ सिमोईस यांनी सांगितले की, एसजीपीडीएच्या घाऊक मासळी मार्केटमध्ये दिलेल्या फीची पावती मिळत नाही. हे मार्केट गोमंतकीयांसाठी असूनही त्यात गोमंतकीयांवर अन्याय होत आहे. एसजीपीडीएची सोपोची निविदा ही स्थानिक मच्छीमार किंवा संघटनांना द्यावी व मार्केट चालवण्यास द्यावे. तसे नसल्यास दोन भागांपैकी एक भाग पारंपरिक मच्छीमारांना व दुसरा घाऊक विक्रेत्यांना द्यावा. पारंपरिक मच्छीमारांचे प्रश्न सोडवण्यात आल्याशिवाय नव्या इमारतीचे उद्‍घाटन होऊ देणार नसल्याचा इशाराही दिला.

सुविधा दिल्या जात असल्याचा दावा

अध्यक्ष दाजी साळकर यांनी सांगितले की, घाऊक मासळी मार्केटमध्ये तासानिहाय कराची रक्कम घेतली जाते. पारंपरिक मच्छीमारांनी ती रक्कम एकरकमी घ्यावी अशी मागणी केली. याआधी त्यांना कराची रक्कम अर्धी करण्यात येई, असे सांगितले होते पण गाड्यांची ओळख पटत नसल्याचे ते शक्य होत नाही. त्यामुळे काही गोंधळ झाला.

यापूर्वी ठरल्याप्रमाणेच स्थानिकांकडून छोट्या गाड्यांसाठी ३०० ऐवजी १५० व मोठ्या गाड्यांसाठी ५०० ऐवजी २५० कर घेतला जाईल. तसेच १० पर्यंत मार्केट बंद करण्यात येत असूनही केवळ रापणकरांना सवलत देत मार्केटची वेळ वाढवली होती. त्यामुळे गोमंतकीयांना आवश्यक त्या सवलती दिल्या जात आहेत. त्यातही आणखी दर कमी करण्याची पारंपरिक मच्छीमारांची मागणी असून वेळ वाढवण्यासंदर्भातही मागणी होती.

त्या मागण्या मंडळाच्या बैठकीसमोर ठेवण्यात येईल. याशिवाय सोपो कराची निविदा स्थानिक मच्छीमार संघटनेला देण्याची मागणी केली. न्यायालयाच्या आदेशानुसार ई निविदा प्रक्रिया असून त्यात सहभागी होण्यास सांगितले असल्याचे साळकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

Crime News: देवगड- फणसे समुद्रकिनाऱ्यावर आढळला शीर नसलेला मृतदेह, घात की अपघात?

काश्मीरनंतर 'द बंगाल फाइल्स'वरुन वाद; ट्रेलर लाँचवेळी कोलकातामध्ये गोंधळ, अग्निहोत्री म्हणाले, 'हुकूमशाही चालणार नाही'

Rain Dogs Exhibition: गोव्यात रविवारी 'रेन डॉग्स' प्रदर्शनाचं आयोजन, छायाचित्रांतून पाहता येणार 'भटक्या कुत्र्यांचे' वास्तव

SCROLL FOR NEXT