Maragao: मडगाव पालिकेला 5.39 कोटींची वित्तीय तुट! अर्थसंकल्प सादर; भरपाईसाठी विरोधकांचा करवाढीला विरोध

Margao Municipal Council: मडगाव पालिकेकडून या वर्षाचा अर्थसंकल्प सोमवारी पालिकेच्या विशेष बैठकीत सादर करण्यात आला.
Margao Municipal Council Budget
Margao Municipal CouncilDainik Gomantak
Published on
Updated on

Margao Municipal Council Budget

मडगाव: मडगाव पालिकेकडून या वर्षाचा अर्थसंकल्प सोमवारी पालिकेच्या विशेष बैठकीत सादर करण्यात आला. या अर्थ संकल्पात महसूल ९४.४९ कोटी दाखवला असून, ९९.८८ कोटी खर्च दाखवण्यात आला आहे. तसेच ५.३९ कोटींचा वित्तीय तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी वाढवलेला कर व सर्व्हेनंतर विनापरवाना आस्थापनांकडूनही येणाऱ्या करातून महसुलात वाढ करत हा खर्च भरून काढण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र विरोधी नगरसेवकांकडून यावर टीका करत हा अर्थसंकल्प वस्तुस्थितीला धरुन नसल्याचा दावा केला.

नगराध्यक्ष शिरोडकर यांनी सांगितले की, यावर्षी विविध करांमध्ये वाढ केलेली आहे, त्यानुसार अर्थसंकल्पात महसुलातही वाढ दाखवण्यात आलेली आहे. घरोघरी कचरा संकलन व कचरा व्यवस्थापनासाठी पाच कोटीची तरतूद, मडगाव पालिका इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामांसाठी १० कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.

इमारत नूतनीकरणाचा आराखडा तयार असून विशेष बैठक घेत पालिका मंडळाकडून निर्णय घेण्यात येईल. घनकचरा व्यवस्थापनाच्या तरतुदीतही दीड कोटींची वाढ केलेली असून त्यात ब्लॅक स्पॉट काढणे, प्रभागाची स्वच्छता, कचरा वाहतूक व इतरही कामे असतील. कामे आउटसोर्स केल्याने जादा महसूल मिळत असल्याने बेलिंगसह काही कामे आउटसोर्स करण्याचा विचार आहे, त्यामुळे दोन अडीच कोटींचा खर्च वाढलेला आहे.

जीआयए सर्व्हेनंतर पालिका क्षेत्रातील विनापरवाना आस्थापने समजून आलेली असून अनेकांनी परवाने घेतलेली आहेत. यातून आता पालिकेचा महसूल वाढणार आहे. सर्व्हेनंतर व्यापार परवाना न घेतलेल्यांना परवाना घेणे भाग पडणार आहे, त्या करामुळे पालिकेच्या अर्थसंकल्पातून तूट भरून काढण्यात येईल.

मडगाव पालिकेच्या बैठकीवेळी मडगाव पालिकेचे काही निरीक्षक व कर्मचारी बैठकीला अनुपस्थित होते. हा विषय नगरसेवकांनी मांडला होता. यावर नगराध्यक्ष शिरोडकर यांनी सांगितले की, जे कर्मचारी नोटीस मिळूनही पालिका बैठकीला अनुपस्थित राहिलेले होते. जे न्यायालयीन कामासाठी बाहेर गेलेले होते, त्यांना वगळून इतरांना मेमो काढण्यात येईल व कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश मुख्याधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

मडगाव पालिका क्षेत्रातील करात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ही करातील दरवाढ सर्वसामान्यांवर बोजा असून सर्व्हेअंती किती महसूल वाढेल ते पाहून व मागील थकबाकी वसुलीनंतरच नवी करातील दरवाढ करण्यात यावी, अशी मागणी फातोर्डा परिसरातील नगरसेवकांनी करत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

नगरसेवक रवींद्र नाईक, पूजा नाईक, घनश्याम शिरोडकर व इतरांनी मुख्याधिकारी मेलविन वाझ यांना निवेदन सादर करत करातील दरवाढ जाचक असल्याचे म्हटले आहे. याशिवाय पालिकेची याआधीची थकबाकी वसुलीनंतर व विनापरवाना आस्थापनांकडून कर वसुलीनंतरच कर वाढीसंदर्भातील निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

पालिकेला महसूल प्राप्त होऊ शकतो. एसजीपीडीएकडून कचरा संकलनाची फी मागील दहा वर्षांपासूनची बाकी आहे, ती ७० ते ८० लाखांची रक्कम येणे बाकी आहे. याशिवाय काही पेट्रोलपंपांची रक्कम यायची आहे.

Margao Municipal Council Budget
Margao Crime: मडगाव प्रकरणातील संशयिताने यापूर्वीही युवतींना फसवल्याचे उघड, मानवी तस्करीचा संशय; पोलिसांकडून तपास सुरू

लिपिकाकडून १७ लाखांची अफरातफर केलेली होती, ते पैसे येणे आहेत. अनेकांनी घरपट्टी भरलेली नाही, बेकायदा आस्थापने, बांधकामे सुरू आहेत, त्यांच्याकडून कराची रक्कम आणली गेल्यास मडगाव पालिकेला मोठ्या प्रमाणात करवाढ करण्याची गरजच भासणार नाही. वाढलेल्या करामुळे छोट्या व्यावसायिकांना हा आर्थिक भार पडणार आहे. फातोर्डा परिसरातील नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करत करातील दरवाढ जैसे थे ठेवण्याची मागणी केलेली आहे.

Margao Municipal Council Budget
Margao City Guide: 'होली स्पिरिट चर्च, ऐतिहासिक वास्तू आणि बरंच काही'... फक्त 24 तासांत मडगाव कसं 'एक्सप्लोर' कराल?

५० ते १०० टक्के करवाढ !

नगरसेवक रवींद्र नाईक यांनी सांगितले की, मडगाव पालिका क्षेत्रातील करामध्ये वाढ करण्यासंदर्भात ज्यावेळी पालिकेची बैठक झालेली होती, त्यावेळी केवळ १० ते २० टक्के करात वाढ करण्यात येत असल्याचे सांगण्यात आलेले होते. मात्र, आता करात वाढ केलेल्या रकमेचा विचार करता काहीठिकाणी ५० ते १०० टक्के करवाढ केलेली आहे. सध्या जीसुडाकडून नेमण्यात आलेल्या एजन्सीकडून सर्व्हे केला जात आहे, त्यातून विनापरवाना व्यापार करणाऱ्यांची नावे उघड होणार असून त्यातूनही मोठ्या प्रमाणात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com