Goa News |Workers Issue Dainik Gomantak
गोवा

Goa News: ‘सेझा’ कामगारांचे भवितव्य अंधारात!

खाणी सुरू करण्याच्या हालचाली चालू असतानाच डिचोलीतील ‘सेझा’ कंपनीच्‍या कामगारांच्या भवितव्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: खाणी सुरू करण्याच्या हालचाली चालू असतानाच डिचोलीतील ‘सेझा’ कंपनीच्‍या कामगारांच्या भवितव्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. लिलाव प्रक्रियेतून डिचोली खाण ब्लॉक घेतलेल्या वेदांता कंपनीकडून या कामगारांना डावलण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे.

त्‍यामुळे डिचोलीतील 313 कामगारांमध्ये खळबळ माजली आहे. सेझाचे कामगार असल्याचा दावा करून वेदांता कंपनीने न्यायालयात धाव घेतल्याची माहिती मिळाली आहे. दरम्‍यान, या कामगारांनी आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडेही धाव घेतली.

कामगार एकवटले आहेत. रविवारी होणाऱ्या मये पंचायतीच्या ग्रामसभेत हे कामगार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. पंचायतीने वेदांताला कोणताच ना हरकत दाखला देऊ नये, असा ठराव स्थानिक कामगार करणार आहेत.

कामगारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

या घडामोडींच्‍या पार्श्वभूमीवर आमदार प्रेमेंद्र शेट यांच्यासह सेझा कामगारांच्या शिष्टमंडळाने शनिवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. खाणी सुरू करताना संबंधित खाणीवरील कामगारांना प्राधान्य द्यावे,

हे सरकारचे धोरण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी कामगारांच्या शिष्टमंडळाला सांगून कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिल्याची माहिती कामगार संघटनेचे अध्यक्ष नीलेश कारबोटकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gram Panchayat CCTV Plan: गोव्यातील प्रत्येक पंचायतीवर सीसीटीव्हीची नजर! तीन आठवड्यांत प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता

Karnataka Accident: कर्नाटकात प्रवाशांवर काळाचा घाला! बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक; 4 ठार, 14 जखमी

Land Compensation: जमीन मोबदल्यासाठी 7 वर्षांची प्रतीक्षा! 15 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या; गोवा खंडपीठाचे निर्देश

World Peace University: तंत्रज्ञानाने जग जवळ आले, पण मने दूरच! विश्वशांतीसाठी राज्यपालांचे महत्त्वाचे आवाहन; 'डब्ल्यूपीयू'च्या परिषदेचे थिवीत उद्‌घाटन

खरी कुजबुज: मंत्र्यांचा पाठिंबा नेमका कोणाला?

SCROLL FOR NEXT