Goa News: तिसवाडीच्‍या घशाची कोरड कायम!

ओपा जलपशुद्धीकरण प्रकल्पावरून जलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू असल्याने तिसवाडीतील जनतेला दोन दिवस पाणीटंचाईला सामोरे जावे लागले.
Goa News|Water Shortage
Goa News|Water Shortage Dainik Gomantak

Goa News: ओपा जलपशुद्धीकरण प्रकल्पावरून जलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू असल्याने तिसवाडी तालुक्यातील जनतेला काल शुक्रवार आणि शनिवारी असे दोन दिवस पाणीटंचाईला सामोरे जावे लागले.

सार्वजनिक बांधकाम खात्याने याबाबत जरी आगाऊ सूचना दिली असली तरी दोन दिवस पुरेल एवढा साठा करणारी साधने नसणाऱ्या नागरिकांना आज पाण्यासाठी वणवण भटकावे लागले. काहींना विहिरी आणि टँकरचा आधार मिळाला.

सार्वजनिक बांधकाम खात्याने मागील आठवड्यात शुक्रवार व शनिवारी पाणीपुरवठा होणार नसल्याचे जाहीर केले होते. ओपा जलप्रक्रिया प्रकल्पाच्या ठिकाणी वाहिन्या बदलाचे काम दोन दिवस चालणार होते.

त्यामुळे ही तांत्रिक टंचाई होणार होती. त्याविषयी नागरिकांना अगाऊ सूचना व माहितीही देण्यात आली होती. परंतु बहुतांश लोकांकडे पाणीसाठा करणारी साधने नसतात. त्‍यामुळे लोकांचे प्रचंड हाल झाले.

तिसवाडी तालुक्‍यातील लोकांना काल शुक्रवारी पाणीटंचाई तेवढी जाणवली नाही. परंतु आज शनिवारी पहाटेपासून अनेकजण हातात भांडी घेऊन पाण्‍यासाठी फिरताना दिसले. आल्तिनो, भाटले परिसरातील लोकांनी थेट पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीकडे धाव घेतली. पाणी आणण्‍यासाठी वाहनांचा वापर करतानाचे दृश्‍‍य सर्वत्र दिसत होते.

Goa News|Water Shortage
Goa Politics: मुख्यमंत्री प्रमोद सावंतांच्या बोम्मईंना शुभेच्छा!

प्रचंड वाढली टँकरची मागणी

महापालिकेने ज्या भागातून मागणी येईल, तसा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरवात केली. शिवाय अनेक हॉटेल्‍समध्ये नेहमीपेक्षा आज टँकरच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे खासगी टँकरची मागणीही वाढली होती. पणजी शहरासह इतर ठिकाणीही पाण्याची तांत्रिक टंचाई दिसून आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com