Smart City Dainik Gomantak
गोवा

Panjim News: पणजीतील मलनिस्सारणाचे काम ठप्प! उत्पल पर्रीकर म्हणाले..

सांतिनेजमध्ये प्रचंड दुर्गंधीने त्रस्त

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim News सांतिनेज परिसरात मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम आठवड्यापासून ठप्प आहे. त्यामुळे येथील नागरिकांवर दिवस-रात्र दुर्गंधी सहन करण्याची वेळ आली आहे. मलनिस्सारणाच्या चेंबरसाठी खोदलेल्या खड्ड्यातील सांडपाणी रात्रीचे उपसा केले जात असल्याच्या तक्रारी आल्याने उत्पल पर्रीकर यांनी नुकतीच या परिसरात रात्रीची भेट दिली.

यावेळी त्यांनी कुठे गेले महापौर आणि नगरसेवक? असा सवाल केला. त्यांनाच खरे तर हा वास घ्यायला लावला पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

गेल्या आठवड्यापासून मलनिस्सारण वाहिनीचे काम बंद आहे. त्यामुळे खड्डे भरून सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. अनेक ठिकाणी रस्ता चिखलमय झाला असून, स्थानिकांसह वाहनचालकांनाही दुर्गंधी सहन करावी लागत आहे.

उत्पल यांनी या भागाला भेट दिल्यानंतर तेथे कोणतेही नियोजन नसल्याचे दिसून आले. यावर कशा पद्धतीने तोडगा काढणार, हेही माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.

बुधवारच्या बैठकीत पडसाद

साबांखा मंत्री नीलेश काब्राल यांच्या कक्षात बुधवारी दुपारी ३ वाजता होणाऱ्या बैठकीसाठी महापौर, महापालिका आयुक्त, जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता, नगरविकास प्राधिकरणाचे सदस्य सचिव, इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लि.चे सरव्यवस्थापक, तसेच साबांखाच्या कार्यकारी अभियंत्यांना निमंत्रित केले आहे. सांतिनेजमधील रखडलेल्या या कामावरून बैठकीत गदारोळ माजण्याची शक्यता नाकारता येत नाही.

साबांखाची मदत घेतलीच नाही

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य नगरविकास प्राधिकरणाने हे काम हाती घेतले आहे, ते करताना सार्वजनिक बांधकाम खात्याची मदत घ्यायला हवी होती, ती घेतली नाही.

साबांखाच्या अधिपत्याखाली मलनिस्सारण विभाग आहे. त्यामुळे त्यांची मदत घेणे अपेक्षित होते, असे काही अभियंते सांगतात. आता बुधवारी स्मार्ट सिटीच्या कामांविषयी विशेष बैठक बोलावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT