Sewage Water In Par River Dainik Gomantak
गोवा

Sewage Water In Par River: धक्कादायक! पार नदीत सोडले मैलामिश्रीत पाणी; पिण्यासाठीही पुरवल्याचे स्पष्ट

नदीतील मैलामिश्रीत पाणी फिल्टर करत घरगुती वापरासाठी पुरवल्याचा धक्कादायक प्रकार

दैनिक गोमन्तक

गेल्या काही दिवसांपुर्वी साळ नदी प्रदुषणावरुन राज्यातील दोन बड्या नेत्यांमध्ये झालेली खडाजंगी संपुर्ण राज्याने पाहिली. या पार्श्वभूमीवर आता पार नदीमध्ये मैलामिश्रीत पाणी सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

(Sewage water released into Par river at Assonora)

मिळालेल्या माहितीनुसार अस्नोडा येथील पार नदीमध्ये मैलामिश्रीत पाणी सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आल्यास याला जबाबदार कोण ? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. याहून गंभीर प्रकार म्हणजे नदीत सोडलेले मैलामिश्रीत पाणी फिल्टर करून घरगुती वापरासाठी पाठवले जात असल्याचे समोर आले आहे. मात्र हे पाणी नेमके कोणत्या प्रकल्पातून फिल्टर केले गेले आहे. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मैलामिश्रीत पाणी हे वृक्ष लागवड अथवा गार्डनसाठी वापरणे अपेक्षित असताना हे पाणी घरगुती वापरासाठी पुरवले गेल्याने हा विषय आता नागरीकांमध्ये चांगलाच रंगला आहे. नागरीकांनी याबाबत आवाज उठवणार असल्याचे म्हटले आहे. यापुढे पार नदीमध्ये मैलामिश्रीत पाणी सोडले जात असल्याचा प्रकार थांबवण्यात आला नसल्यास नागरीकांना वेगळी भुमिका घ्यावी लागेल असेही अस्नोडा येथील काही नागरिकांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT