Poor Road
Poor Road Dainik Gomantak

Poor Road Condition: पणजीत रस्त्यांची दुरवस्था, माफी मागत महापाैरांनी केली मोठी घोषणा

एरव्ही सोयीनीं सुसज्ज असलेल्या पणजीत सध्या 'रस्त्यांची दुरावस्था' हा विषय चर्चेचा बनला आहे.

फेसाळणारा गर्दनिळा-विस्तीर्ण समुद्र, चंदेरी वाळूच्या किनारपट्ट्या, दर्जेदार हॉटेल, रुचकर जेवण तसेच पर्यटनदृष्ट्या सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या गोव्याकडे नेहमीच पर्यटकांचा ओढा असतो. गोव्यात सध्या आंतरराष्टीय चित्रपट महोत्सव सुरु असून काही दिवसांवर ख्रिसमस येऊन ठेपलाय. तसेच न्यू इयर सेलिब्रेशनसाठीही पर्यटक गोव्यात दाखल होऊ लागले आहेत. एरव्ही सोयीनीं सुसज्ज असलेल्या गोव्यात सध्या 'रस्त्यांची दुरवस्था' हा विषय चर्चेचा बनला आहे.

इफ्फि तसेच ऐन पर्यटना हंगाम सुरु होताना गोव्याची राजधानी असलेल्या पणजी शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्यामुळे आणि रस्ते बंद झाल्यामुळे पर्यटकांना फिरणं त्रासदायक होत आहे. जुन्या पणजी भागातील अरुंद गल्ल्या- गटार लाइन बदलण्यासाठी आणि नाल्यांच्या पुनर्बांधणीसाठी आणि इतर सुविधांसाठी खोदण्यात आल्या आहेत. या बाबत पणजी शहरातील कॉर्पोरेशनचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिलगिरी व्यक्त करत रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल माफी मागितली.

Poor Road
Goa News : पणजीत रस्ते दुरुस्तीचे काम सुरु | Road repair work starts in Panaji | Gomantak Tv

"लोकांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल मी दिलगीर आहोत, तथापि, जे काही काम केले जात आहे ते पूर्णपणे आवश्यक आहे. फुटपाथ, ड्रेनेज सिस्टीम हि कामे गेल्या 30 ते 30 वर्षांपासून केलेली नाहीत. सध्या जीएसयूडीएने हाती घेतलेल्या रस्त्याच्या कामात सांडपाणी, पाणी, वीज, सांडपाणी वायू इत्यादी सर्व सुविधा असतील. सुरू असलेली कामे पूर्ण झाल्यानंतर पुढील 15 ते 20 वर्षे रस्ते खोदण्याची गरज भासणार नाही, असे मोन्सेरात म्हणाले. तसेच पणजी शहराला मास्टर प्लॅनची ​​गरज असल्याचे मतही महापौर मोन्सेरात यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com