substandard chamber of pumping station in colva Dainik Gomantak
गोवा

Colva News: सांडपाणी रस्‍त्‍यावर; कोलवातील चेंबरचे निकृष्ट बांधकाम

Colva Chamber Issue: काम अत्‍यंत निकृष्‍ट दर्जाचे झाल्‍यामुळेच या चेंबरमधून पाणी वाहते असा आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: कोलवा येथे सांडपाण्‍यावर प्रक्रिया करण्‍यासाठी एसटीपी प्रकल्‍प बांधण्‍यात येणार आहे, यासाठी जे पंपिग स्‍टेशन तयार केले आहेत. त्‍या पंपिंग स्‍टेशनच्‍या चेंबरमधून पाणी रस्‍त्‍यावर ओसंडून वाहत आहे. हे काम अत्‍यंत निकृष्‍ट दर्जाचे झाल्‍यामुळेच या चेंबरमधून पाणी वाहते, असा आरोप कोलवातील ग्रामस्थ हेराल्‍ड फर्नांडिस यांनी केला.

या संदर्भात कोलवातील सिमाव रॉड्रीगीस यांनी तक्रार केली होती. त्‍यानंतर पंचायतीचे प्रतिनिधी आणि सांडपाणी व्‍यवस्‍थापन महामंडळाचे अभियंत्‍यांनी काल या जागेची पाहणी केली. मात्र या समस्‍येवर समाधानकारक उत्तर हे अभियंते देऊ शकले नाहीत, असे रॉड्रिगीस यांनी यावेळी सांगितले.

आता पावसाचे पाणी या चेंबरमधून रस्‍त्‍यावर वाहते, उद्या त्‍यातून सांडपाणी सोडल्‍यास हे सांडपाणी रस्‍त्‍यावरुन कसे वाहणार? असा सवाल त्‍यांनी केला. मात्र आपल्‍या या प्रश्‍नाला सदर अभियंत्‍याकडून कुठलेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही, असे त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT