Mapusa District Hospital Dainik Gomantak
गोवा

म्हापसा जिल्हा रुग्णालयाचे सांडपाणी रस्त्यावरच; रुग्णांच्या आरोग्याशी खेळ

रुग्णालयाचे सांडपाणी गटारात आणि नंतर रस्त्यावर वाहत असून, त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे.

दैनिक गोमन्तक

Mapusa District Hospital: नागरीकांच्या सेवेसाठी म्हापसा येथे सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय तयार केले आहे. मात्र, ज्या रुग्णालयाने लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे, तेच रुग्णालय आपल्या आवाराबाहेरील सांडपाणी बाहेर टाकत असून ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.

म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयाचे (Mapusa District Hospital) सांडपाणी गटारात आणि नंतर रस्त्यावर वाहत असून, त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. ज्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना यापासून आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.

रुग्णालयावर कोटय़वधी रुपये खर्च करूनही सांडपाण्याच्या कामाकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यायला हवी होती. या प्रकाराकडे सामाजिक कार्यकर्ते संजय बर्डे (Sanjay Barde) यांनी लक्ष वेधले आहे. याबाबत त्यांनी सरकारला जाब विचारला आहे.

खुद्द रुग्णालयाच्या इमारतीचे कामही निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यांनी वरवर फॅब्रिकेशन केले आहे. कामांची देखरेख करणाऱ्या सहाय्यक अभियंत्याने योग्य काम झाल्याचे दिसायला हवे होते, असे बर्डे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: एकाच घरात पाच जणांचे मृतदेह आढळले! दोन मुली, 12 वर्षांचा मुलगा आणि आई-वडिलांचा मृत्यू; परिसर हादरला, घटनेमागचं कारण काय?

8th Pay Commission Latest Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार एरियर? जानेवारी 2026 पासूनच्या थकबाकीबाबत जाणून घ्या ताजे अपडेट

FIR Case: 2017 च्या विमान प्रकरणात मोठा न्यायालयीन निर्णय; राज्यपालांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधातील मागणी फेटाळली

Goa Politics: गोवा फॉरवर्डची विरोधकांना एकत्र येण्याची हाक; काँग्रेससह सर्व पक्षांशी तातडीने चर्चा करणार

Pakistan Players Central Contract: "सॅलरी पाहिजे? मग आधी खेळायला शिका!", मोहसिन नक्वीने रोखले खेळाडूंचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्स; काढला नवा फतवा

SCROLL FOR NEXT