Fatorda Lake Dainik Gomantak
गोवा

फातोर्ड्यातील प्रसिद्ध दामोदर तळीमध्ये सोडले जाते सांडपाणी

मडगाव नागरी आरोग्य केंद्रातर्फे फातोर्डा येथील दामोदर तळीच्‍या जलप्रवाहाची पाहणी करण्‍यात आली

दैनिक गोमन्तक

सासष्टी: स्थानिक रहिवाशी नितीन नागवेकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन गोवा प्रदूषण नियंत्रण बोर्ड व मडगाव नागरी आरोग्य केंद्रातर्फे फातोर्डा येथील दामोदर तळीच्‍या जलप्रवाहाची पाहणी करण्‍यात आली. (Sewage discharged into famous Damodar Lake in Fatorda)

त्‍यावेळी तळीच्‍या (Lake) पाण्‍यात सांडपाणी मिसळत असल्‍याचे दिसून आले. ही बाब गंभीर असून, मडगाव नगरपालिकेला (Margao Municipality) पत्र लिहून हे सांडपाणी नेमके कोठून येते याची तपासणी करण्याचे आदेश देण्यात येतील, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे सांडपाणी जलप्रवाहात मिसळतेय, त्‍या इमारतीला नोटीस पाठविली जाईल असे आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. सुकोरो क्वाद्रुस यांनी सांगितले. हा परिसर स्वच्छ रहावा तसेच डांसाची पैदास होऊन रोगराई पसरु नये यासाठी आपण प्रदूषण नियंत्रण बोर्ड व आरोग्य केंद्राकडे तक्रार केल्याचे तक्रारदाराने सांगितले. दरम्‍यान, येथील कचऱ्याचा प्रश्र्न सोडविण्यासाठी पालिकेला पत्र लिहिणार असल्याचेही तक्रारदाराने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amthane Dam Overflow: 'आमठाणे' धरण ओव्हरफ्लोच्या उंबरठ्यावर! 52 मीटरची क्षमता; सध्या 50 मीटर पाणीसाठा

Omkar Elephant: 'ओंकार'चा पुन्हा गोव्यात प्रवेश! मोपा परिसरात सध्या वावर; पिकांवर संकट, वनखात्याची धावपळ

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर ते बेसिक पे... 8वा वेतन आयोग 7व्या आयोगापेक्षा कसा वेगळा? कर्मचाऱ्यांवर परिणाम करणारे 5 मोठे बदल!

Modi Government Political Challenges: राहुल गांधी आणि 'सीजेपी'चे मोदी सरकारपुढे आव्हान

'मिशन 21'! शिंदेंच्या शिवसेनेचा गोव्यात 'एकला चलो रे'चा नारा; महाराष्ट्रात भाजपसोबत युती, मग गोव्यात वेगळा संसार कशासाठी?

SCROLL FOR NEXT