Seven protesting Anganwadi teachers Dainik Gomantak
गोवा

... तर आम्ही पाण्याचा थेंबही घेणार नाही

अंगणवाडी सेविका आक्रमक : आम्ही राजकीय पक्षाशी संबंधित नाही

दैनिक गोमन्तक

पणजी : सरकारने बडतर्फ केलेल्या अंगणवाडी सेविका गेल्या ४१ दिवसांपासून आंदोलनाला बसल्या आहेत. मागील 21 दिवसांपासून त्या बेमुदत उपोषण करत आहेत. मात्र, आज संध्याकाळपर्यंत जर कामावर बिनशर्त रुजू करण्याचे आदेश जारी केले नाहीत तर आम्ही पाण्याच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही. याचे जे काही परिणाम होतील, त्याला संबंधित विभाग आणि सरकार सर्वस्वी जबाबदार असेल, असे अंगणवाडी सेविका संघटनेच्या दिव्यानी तामसे यांनी सांगितले.

आझाद मैदानावर प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी सांगितले, की अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर धरणे आंदोलन केले, त्यावेळी दीड हजार सेविका या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हतो. त्यामुळे आम्हाला बिनशर्त कामावर रूजू करून घ्यावे, अशी मागणी अंगणवाडी सेविका संघटनेच्या दिव्यानी तामसे यांनी केली.

यावेळी अंगणवाडी सेविकांचे नेते हृदयनाथ शिरोडकर म्हणाले, भाजप सरकारला 100 दिवस पूर्ण झाले म्हणून मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आनंद साजरा करत आहेत. मात्र, हा आनंद तेव्हाच खऱ्या अर्थाने साजरा होईल, ज्यावळी या सेविकांना सरकार कामावर रूजू करून घेईल. सध्या या सेविका भर पावसात आंदोलन करत आहेत. या सेविकांचे काही बरे वाईट झाले तर त्याला विद्यमान सरकार जबाबदार असेल.

भाजपच्या महिला संघटना कुठे आहेत?

महेश म्हांबरे म्हणाले, महिलांच्या सबलीकरणावर बोलणाऱ्या सरकारने या सेविकांना गेले ४१ दिवस घराबाहेर बसविले आहे. मात्र, या सरकारला काहीही सोयरसुतक नाही. या सेविकांची भाजपच्या महिला संघटनांनाही विचारपूस देखील करावीशी वाटत नाही. आता भाजपच्या महिला संघटना कुठे आहेत? आपल्या हक्कांसाठी धरणे करणे हा संविधानिक अधिकार आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्याकडून हमीपत्र मागणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

SCROLL FOR NEXT