भाजपच्या सोहळ्यात सभापती महोदय कशाला?

ट्रोजन डिमेलोंचं टीकास्त्र : वाढत्‍या महागाईने सामान्‍यांचे कंबरडे मोडले
Goa TMC Trojan demello
Goa TMC Trojan demelloDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : सत्ताधारी भाजप सरकारने आज शंभर दिवस पूर्ण केले म्‍हणून सोहळा साजरा केला. या सोहळ्याला सभापती रमेश तवडकर उपस्‍थित होते. सभापती पद हे अराजकीय असते. राजकीय पक्षांच्‍या सोहळ्यांना सभापतींनी उपस्‍थित राहणे योग्‍य नाही, मग तो स्वपक्ष का असेना. तरीही भाजपच्‍या या सोहळ्यास सभापती तवडकर यांनी उपस्‍थित राहणे निषेधार्ह आहे, असे तृणमूल काँग्रेसचे ट्रोजन डिमेलो यांनी म्‍हटले.

पक्षाच्‍या कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अविता बांदोडकर, प्रतिभा बोरकर आणि ॲना ग्रासियस उपस्‍थित होत्‍या.

देशातील महागाईने उच्चांक गाठला आहे. जीवनावश्‍यक वस्‍तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. तरीही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्‍याचा सोहळा साजरा करत आहेत. राज्‍यात पूरसदृश परिस्‍थिती निर्माण झाली आहे. कडधान्‍यासह भाजीचे दरही वाढले आहेत. त्‍यातच आज घरगुती गॅस सिलिंडरमध्ये 50 रुपयांची वाढ झाली आहे. अशावेळी सरकारला सोहळा साजरा करण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका अविता बांदोडकर यांनी केली. राज्‍यातील प्रमुख शहरांतील रस्‍त्‍यांची दुर्दशा झाली आहे. इंधन दरात वारंवार वाढ होत आहे. तरीही सरकार डोळ्यांवर पट्टी बांधून बसते, असेही बांदोडकर म्‍हणाल्‍या.

Goa TMC Trojan demello
आरक्षणप्रश्‍नी ओबीसी आमदार, मंत्र्यांनी राजीनामा द्यावा

सोहळे कसले साजरे करता?

एकीकडे सर्वसामान्‍यांसाठी काम करणारे सरकार म्‍हणून भाजप ढोल पिटत आहे. दुसरीकडे जीवनावश्‍यक वस्‍तूंचे दरही वाढवत आहे. गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे सरकार म्‍हणवून घेणाऱ्या भाजप सरकारला कोणताही सोहळा करण्याचा अधिकार नाही, अशी टीका प्रतिभा बोरकर यांनी केली.

महिलांनी आवाज उठवावा

भाजप हे श्रीमंतांचे सरकार आहे. गोरगरिबांकडे लक्ष द्यायला भाजप सरकारकडे वेळ नाही. सोहळ्यांवर उधळपट्टी करणाऱ्या सरकारकडे योजना कार्यान्‍वित करण्यासाठी पैसे नाहीत. यासाठी गोमंतकीयांनी एकत्र येण्याची वेळ आली असून विशेषतः महिलांनी सरकारविरुद्ध आवाज उठविण्याची गरज असल्‍याचे ॲना ग्रासियस म्‍हणाल्‍या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com