SET Panjim exam centres Dainik Gomantak
गोवा

Goa Education: पुणे विद्यापीठाची 'SET' परीक्षा गोव्यात 15 तारखेला, दोन सत्रात होणार पेपर; तुमचं केंद्र कोणतं? जाणून घ्या

SET Goa Centre: पुणे विद्यापीठाद्वारे आयोजित करण्यात येणारी ४०वी महाराष्ट्र राज्य प्राध्यापक पात्रता चाचणी (एम-सेट) येत्या रविवार १५ जून रोजी पार पडणार आहे

Akshata Chhatre

पणजी: महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांसाठी पुणे विद्यापीठाद्वारे आयोजित करण्यात येणारी ४०वी महाराष्ट्र राज्य प्राध्यापक पात्रता चाचणी (एम-सेट) येत्या रविवार १५ जून रोजी पार पडणार आहे. प्राध्यापक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वपूर्ण परीक्षा असते.

या चाचणीसाठी गोव्यातून एकूण ३३४५ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ही परीक्षा राज्यातील विविध सात केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे.

सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत सामान्यज्ञान विषयाचा पहिला पेपर होईल, तर त्यानंतर सकाळी ११.३० ते दुपारी १.३० या वेळेत विषय-आधारित दुसरा पेपर घेतला जाईल. एकूण ३२ विविध विषयांसाठी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

परीक्षेची केंद्रे पणजी, कुजिरा-बांबोळी आणि मिरामार परिसरात आहेत. यामध्ये

  • डॉन बॉस्को उच्च माध्यमिक विद्यालय आणि महाविद्यालय (पणजी)

  • डॉन बॉस्को शाळा (पणजी)

  • मुष्टिफंड माध्यमिक विद्यालय (कुजिरा-बांबोळी)

  • हेडगेवार माध्यमिक विद्यालय (कुजिरा-बांबोळी)

  • साळगावकर कायदा महाविद्यालय (मिरामार)

  • वसंतराव धेंपो उच्च माध्यमिक विद्यालय (कुजिरा-बांबोळी)

  • गोवा विद्यापीठाचा ब्लॉक -ई (ताळगाव)

यांचा समावेश आहे.

उमेदवारांना त्यांच्या प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या परीक्षा केंद्रावर वेळेत हजर राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या परीक्षेमुळे गोव्यातील हजारो उमेदवारांना प्राध्यापक पदासाठी आपली पात्रता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

Goa Politics: जाहीर सभेसाठी आम्हाला सरकारने जागा नाकारली, खासगी जागेवर सभेचे आयोजन करावं लागलं; चोडणकरांचा आरोप

Military Dog Tyson: लष्कराचा श्वान ‘टायसन’ला शौर्यसन्मान, गोळी झाडल्यानंतरही दहशतवाद्यांवर केला होता हल्ला

SCROLL FOR NEXT