Goa Accident News Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News: राज्यात अपघातांची मालिका सुरूच बस-टुरिस्ट टॅक्सीची समोरासमोर टक्कर

Goa Accident News: अपघात थांबेनात पर्वरी महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा

दैनिक गोमन्तक

Goa Accident News: पर्वरी येथील राष्ट्रीय महामार्गावर खासगी बस व इनोव्हा या टुरिस्ट टॅक्सीमध्ये समोरासमोर टक्कर झाली. परिणामी, या अपघातामुळे म्हापसा व पणजी या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या. नंतर क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करेपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

दरम्यान, अपघातात बसमधील चार प्रवासी हे किरकोळ जखमी झाले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. शुक्रवारी (ता.२२) दुपारी ३.३० वा.च्या सुमारास हा अपघात पर्वरी-तिस्क येथे चॅपेलसमोर घडला.

प्राप्त माहितीनुसार, राजू ट्रॅव्हल्स (जीए ०४ टी ५९३१) ही पणजी-वाळपई बस म्हापशाच्या दिशेने सुसाट जात होती. तर, इनोव्हा (जीए ०३ एन ८०१०) ही टॅक्सी मोपाहून पणजीच्या दिशेने जात असताना या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक बसल्याने हा अपघात झाला.

बसचालकाने योग्य लेन न पाळल्याने त्याने इनोव्हा कारला धडक दिली. यात इनोव्हाच्या दर्शनी भाग चक्काचूर झाला. तर बसच्या वाहकच्या दर्शनी बाजूने गाडीचे नुकसान झाले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

पाचजण किरकोळ जखमी

बसमध्ये चार प्रवासी व टॅक्सीमधील मुंबईचा पर्यटक असे मिळून एकूण पाचजण किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर गोमेकॉत उपचार करून नंतर सर्वांना घरी सोडण्यात केले. बसचालक नासेर हुसेन (३३, भुईपाल-वाळपई) याने बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस प्रीतम दाभोलकर पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT