Serendipity Arts Festival Dainik Gomantak
गोवा

Serendipity Festival: 15 नाट्यप्रयोग, 17 मैफिली, कार्यशाळा! सेरेंडीपिटीचा गाजवाजा सुरू

Serendipity Arts Festival Goa: पणजीत होणाऱ्या यंदाच्या सेरेंडीपिटी कला महोत्सवाला अजून सुमारे दोन महिने बाकी आहेत मात्र या महोत्सवाचा गाजावाजा जोरदारपणे सुरू झाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजीत होणाऱ्या यंदाच्या सेरेंडीपिटी कला महोत्सवाला अजून सुमारे दोन महिने बाकी आहेत मात्र या महोत्सवाचा गाजावाजा जोरदारपणे सुरू झाला आहे. महोत्सवाच्या संकेतस्थळावर, महोत्सवात होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या तारखा आणि त्यांची स्थळे जाहीर झाली आहेत.‌ यातील काही कार्यक्रम तर आताच हाउसफुल झालेले दिसतात. प्रदर्शन, कार्यशाळा आणि सादरीकरण अशा तीन विभागात या महोत्सवातील कार्यक्रम भरगच्चपणे सादर होणार आहेत. 

प्रदर्शन विभागात जुने मेडिकल कॉलेज संकुल, लेखा संचालनालयाची जुनी इमारत, मिरामार समुद्रकिनारा, जुने पीडब्ल्यूडी संकुल, आर्ट पार्क काम्पाल, कला अकादमी, आझाद मैदान, कॅप्टन ऑफ पोर्टस या स्थळांवर विविध प्रदर्शने आयोजित होणार आहेत.

मिरामार समुद्रकिनाऱ्यावर आयोजित होणारे टॅराग्रोव्ह हे प्रदर्शन, जुन्या मेडिकल कॉलेज संकुलात भरणारे ज्येष्ठ कलाकारांच्या रेसिडेन्सी निर्माण झालेले दृश्य कल प्रदर्शन, आझाद मैदानावरील पेपर क्राफ्टमधून तयार झालेल्या पायऱ्या पायऱ्यांच्या विहिरींचे प्रदर्शन, जुन्या मेडिकल कॉलेज संकुलातील रेल्वेच्या डब्यांमध्ये असणाऱ्या अन्नाच्या सुगंधांचा माग घेणारे प्रदर्शन ही काही अनोखी प्रदर्शने या सरेंडीपिटी महोत्सवाचा भाग असतील. 

सादरीकरण कलांमध्ये नृत्य, संगीत आणि नाट्य या कलांमधील संपन्नता आपल्याला अनुभवता येईल. सेरेंडीपिटी महोत्सवात सादर होणाऱ्या नाट्यप्रयोगांचा इतिहास पाहिल्यास, महोत्सवातील हा एक वेधक आणि रोमांचक विभाग आहे हे आपल्या लक्षात येईल. यंदाही या महोत्सवात सादर होणारी नाटके त्याच तोलमोलाची आहेत हे महोत्सवाच्या वेळापत्रकावर नजर टाकल्यास कळून येते.

सुमारे 15 नाट्यप्रयोगांचा समावेश या महोत्सवात आहे. त्यात ‘संयुक्त मानापमानाची कथा’ व ‘बोलाविता धनी’ ही दोन मराठी नाटके सामील आहेत हे विशेष. त्याशिवाय 13 नृत्य सादरीकरणे, 17 संगीताच्या मैफिली आपल्याला सादरीकरण विभागात अनुभवायला मिळतील.‌ महोत्सवाच्या विशेष प्रकल्पातून सादर होत असलेली सुमारे पाच सादरीकरणेही या विभागाचा भाग आहेत.  सादरीकरण कलांमधील बहुतेक कार्यक्रमांसाठी शुल्क आकारण्यात आले आहे. 

या महोत्सवातील अन्नविषयक कार्यशाळा (कलनरी आर्ट्स) नेहमीच हाउसफुल असतात.‌ यंदाही सुमारे 7 अन्नविषयक कार्यशाळा या महोत्सवात असणार आहेत. या साऱ्याच कार्यशाळा अनोख्या आहेत. 3 नृत्य कार्यशाळा, दोन संगीत कार्यशाळा, 11 लहान मुलांसाठी कार्यशाळा, सर्व वयाच्या लोकांसाठी काही कार्यशाळा असा या महोत्सवात विविध कार्यशाळांचा समावेश आहे. यातील बऱ्याच कार्यशाळा मोफत आहेत. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT