
कोणत्याही महोत्सवाचे मोठेपण त्यातील कार्यक्रमांचे क्युरेटर्स कोण आहेत यावरून ठरते. सेरेंडिपिटी कला महोत्सवाला प्रतिष्ठा देण्यात त्याच्या क्युरेटर्सनी आतापर्यंत महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
यंदा त्यांच्या क्युरेटर्सच्या नव्या यादीत काही जुनी नावे आहेत तसेच आपापल्या कार्यक्षेत्रात दिग्गज असलेल्या काही कलाकारांची नावेही या यादीत समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे यंदाचा सेरेंडिपिटी कला महोत्सव देखील आपल्या जुन्या लौकिकानुसार सादर होईल अशीच अपेक्षा आहे.
सेरेंडिपिटी कला महोत्सव आपली दहावी आवृत्ती 12 ते 21 डिसेंबर 2025 दरम्यान पणजी, गोवा येथे साजरी करणार आहे. या महोत्सवात यंदा 35 पेक्षा अधिक क्युरेटर्स सहभागी होत आहेत.
यात शुभा मुद्गल, लिलेट दुबे, एहसान नूरानी, मनु चंद्रा, गीता चंद्रन यांसारख्या नामवंतांचा समावेश आहे. दृश्यकलेसाठी रणजीत होस्कोटे, ठुकराल-टाग्रा, सुदर्शन शेट्टी, वीरांगनाकुमारी सोलंकी यांसारखे क्युरेटर्स निवडले गेले आहेत. हस्तकलेसाठी क्रिस्टीन मायकल, रश्मी वर्मा आणि अंजना सोमनी यांची निवड झाली आहे.
फोटोग्राफी विभागात रवी अगरवाल, रहाब अल्लाना, प्रशांत पंजियार आणि दिनेश खन्ना काम पाहणार आहेत. नृत्यात गीता चंद्रन, जयचंद्रन पलाझी, रंजना दवे आणि तनुश्री शंकर तर रंगभूमीमध्ये महेश दत्तानी, अनुराधा कपूर, लिलेट दुबे यांचा समावेश आहे. संगीत विभागात एहसान नूरानी, झुबिन बालापोरिया, शुभा मुद्गल, रंजीत बारोट सहभागी होणार आहेत. पाककलेसाठी मनु चंद्रा, ओडेट मॅस्करेनहस, राहुल अकेरकर यांची निवड झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.