Ramnath Gawade Suicide Dainik Gomantak
गोवा

वरिष्‍ठ अधिकाऱ्यांच्या छळामुळेच साहाय्यक जेलरची आत्महत्या; रामनाथ गावडे यांच्‍या पत्नीचा आरोप, पोलिसांत तक्रार; प्रकरणाची सखोल चौकशी होणार

Ramnath Gawade Suicide: कोलवाळ येथील केंद्रीय कारागृहात साहाय्यक अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या रामनाथ गावडे यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्याने मानसिक छळ करण्यात आला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: कोलवाळ येथील केंद्रीय कारागृहात साहाय्यक अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या रामनाथ गावडे यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्याने मानसिक छळ करण्यात आला. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप त्यांच्या पत्नी रुतिका रामनाथ गावडे यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी फोंडा पोलिस निरीक्षकांकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.

तक्रारीनुसार, रामनाथ गावडे यांनी ७ जुलै २०२६ रोजी कारागृह महानिरीक्षक तसेच केंद्रीय कारागृहाच्या अधीक्षकांकडे राजीनामा सादर केला होता. मात्र, त्यावर कोणताही लेखी निर्णय देण्यात आला नाही.

त्यानंतर कुटुंबाची आर्थिक जबाबदारी आणि मुलांच्या शिक्षणाचा विचार करून त्यांनी राजीनामा मागे घेण्याबाबतही स्वतंत्र अर्ज केला होता. या दोन्ही पत्रांच्या प्रती तक्रारीसोबत जोडण्यात आल्या आहेत.

जेलरसोबत संभाषण नेमके काय?

तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, १५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी कारागृहातील जेलर परेश देसाई यांच्या मोबाईलवरून रामनाथ गावडे यांना मिस्ड कॉल आला होता. त्यानंतर त्यांनी त्यांना परत फोन केला. या संभाषणाचा नेमका विषय आजपर्यंत कुटुंबाला समजू शकलेला नसून, त्या दिवशीच्या कॉल रेकॉर्डचे छायाचित्रही पुरावा म्हणून जोडण्यात आले आहे.

राजीनामा का स्वीकारला नाही?

रुतिका गावडे यांनी आपल्या तक्रारीत केंद्रीय कारागृहातील अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांच्या पतीवर प्रचंड मानसिक ताण निर्माण झाला आणि त्यातूनच त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला आहे.

त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून राजीनामा का स्वीकारला गेला नाही, त्यांच्यावर कोणत्या प्रकारचा मानसिक दबाव होता, तसेच संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

Bhumi Pednekar: 'मी मूळची पेडण्याची, मला गोव्याची असल्याचा नेहमीच अभिमान वाटतो'; अभिनेत्री भूमी पेडणेकरनं सांगितलं गोवा कनेक्शन

RGP Controversy: ‘त्‍या’ दहाजणांचे निलंबन मागे; आरजीपीचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष बोरकर यांच्‍याकडून आदेश जारी

धरणात विद्यार्थिनींसोबत आंघोळ अन् VIDEO व्हायरल! प्राचार्याच्या कृत्यावर संताप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये, थेट निलंबनाची कारवाई

SCROLL FOR NEXT