Goa Assembly Dainik Gomantak
गोवा

गोव्यात सभापतींची निवड 29 मार्चला

चौघांची नावे चर्चेत: नव्या विधानसभेचे पहिले अधिवेशन 29, 30 रोजी

दैनिक गोमन्तक

पणजी: भाजपचे सावंत सरकार 28 मार्च रोजी अस्तित्वात आल्यानंतर लगेच 29 मार्चपासून विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेच्या सभापतींची निवड करण्यात येणार असून या पदासाठी हंगामी सभापती गणेश गावकर, रमेश तवडकर, सुभाष फळदेसाई, सुभाष शिरोडकर यांच्या नावाची चर्चा आहे. नव्या विधानसभेचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने राज्यपालांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात होईल, अशी माहिती विधानसभा सचिव नम्रता उलमन यांनी दिली.

भाजपने डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांकडे केल्यानंतर राज्यपालांनी त्याला मान्यता दिली असून 28 मार्च रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात अधिकृत कामकाजाशिवाय प्रश्नोत्तराच्या तासासह इतर कोणतेही कामकाज होणार नाही. सुरुवातीलाच सभापतींची निवड होईल. त्यानंतर राज्यपालांचे अभिभाषण होईल.

गणेश गावकर हंगामी सभापती

राज्यपालांनी 29 व 30 मार्चला विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन बोलावल्याने सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांची हंगामी सभापतीपदी नियुक्ती केली आहे. नव्या सभापतींची निवड होईपर्यंत ते विधानसभेचे कामकाज हाताळणार आहेत. 29 रोजी सकाळी 11.30 वा. नव्या सभापती निवडीची वेळ राज्यपालांनी निश्‍चित केली आहे. हल्लीच हंगामी सभापतीपदी गणेश गावकर यांची नियुक्ती करून एक दिवसाचे अधिवेशन बोलावले आणि नवनिर्वाचित आमदारांना पद व गोपनीयतेची शपथ दिली होती.

जीएसटी परतावा मिळाल्यास राज्याची आर्थिक स्थिती सुधारेल. केंद्र सरकारच्या नव्या आर्थिक धोरणानुसार जीएसटी परतावा मिळण्याबाबत काही अडचणी येऊ शकतात. केंद्र सरकारने राज्यांना नवे उत्पन्नाचे मार्ग शोधा, अशा सूचना केल्या आहेत. मात्र, यावर्षी जीएसटीचा परतावा मिळाल्यास कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण येणार नाही.

- डॉ. प्रमोद सावंत, काळजीवाहू मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT