‘गोमन्तक’चा वर्धापनदिन सोहळा दिमाखात साजरा

विश्‍वासाची 60 वर्षे: विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Chief Minister Pramod Sawant
Chief Minister Pramod Sawant Dainik Gomantak

पणजी: गोवा मुक्तिनंतरचे राज्यातील पहिले दैनिक ‘गोमन्तक’च्या 60 व्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री, आमदार, खासदार, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, वाचक आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छांचा वर्षाव केला. विश्‍वासार्हता तसेच निर्भीडतेचे प्रतीक असलेल्या दैनिक ‘गोमन्तक’च्या कार्यालयात हा सोहळा मोठ्या उत्साहात झाला.

Chief Minister Pramod Sawant
म्हापसा बाजारात सोपो कर दुप्पट

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, सर्वच क्षेत्रांत ‘गोमन्तक’चे भरीव योगदान तसेच निर्भीड व तटस्थ पत्रकारितेबद्दल असलेली भूमिका यांमुळे ‘गोमन्तक’ने लोकांच्या मनात व हृदयात स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच 61 व्या वर्षात पदार्पण केलेल्या ‘गोमन्तक’वरील लोकांचा विश्‍वास कायम आहे, अशा शब्दांत गाैरव केला. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर, माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, आमदार दाजी साळकर, वीरेश बोरकर, गोविंद गावडे आदी आमदारांसह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांनी या स्नेहमेळाव्याला हजेरी लावत ‘गोमन्तक’च्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.

उत्साहवर्धक स्नेहमेळावा

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गोमन्तकच्या वाचकांसह सर्वजण प्रतिकूल परिस्थितीत होते. त्यामुळे दरवर्षी होणारा वर्धापनदिन स्नेहमेळावा होऊ शकला नव्हता. यंदा मात्र कोरोनातून काहीसा दिलासा मिळाल्याने ‘गोमन्तक’ने आपल्या वाचकांसाठी भव्य स्नेहमेळावा आयोजित केला होता. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक क्षेत्रांतील मान्यवरांनी ‘गोमन्तक’चे कौतुक केले.

सत्यनारायण महापूजा

सांत इनेज येथील ‘गोमन्तक भवन’मध्ये श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले होते. यानिमित्त आयोजिलेल्या स्नेहमेळाव्याला लोकांनी उपस्थिती लावून ‘गोमन्तक’वरील प्रेम, विश्‍वास व जिव्हाळा तसेच हे दैनिक प्रत्येक घरातला अविभाज्य घटक असल्याचे दाखवून दिले. या वर्धापन दिनानिमित्त आयोजित महापूजेचे यजमानपद सौ. व श्री. विक्रम पाटील आणि शीतल पाटील यांनी भूषविले.

Chief Minister Pramod Sawant
पर्वरीतील वेश्याव्यवसायाचा क्राईम ब्रांचकडून पर्दाफाश

व्यस्त कार्यक्रमातूनही मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

सध्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे शपथविधी सोहळ्याच्या तयारीत पूर्णपणे व्यस्त आहेत. याशिवाय दैनंदिन कार्यक्रमांमध्ये व्यस्त असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आज दै. ‘गोमन्तक’मध्ये हजेरी लावत शुभेच्छा दिल्या, याशिवाय सध्याच्या राजकीय आणि राज्याच्या आर्थिक स्थितीबाबतही चर्चा केली. यावेळी त्यांनी निवडणुकीतील काही गमती-जमतीही शेअर केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com