Criem Dainik Gomantak
गोवा

पत्नीचा खून करण्यासाठी वापरलेला चाकू जप्त

पती गुलशन तिरके याने वापरलेला चाकू मायणा कुडतरी पोलिसांनी (Police) जप्त केला आहे.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: चारित्र्याचा संशय घेऊन वयलेमळ सांजुझे आरियलयमध्ये गुरुवारी पत्नीचा हिचा खून करण्यासाठी पती गुलशन तिरके याने वापरलेला चाकू मायणा कुडतरी पोलिसांनी (Police) जप्त केला आहे. हा चाकू संशयिताने पत्नीचा पोटात खूपसल्यावर राहत्या भाड्याच्या घरातच लपवून ठेवला होता.

चाकूने वार करुन पत्नी बासंती तिरके (20) हिचा खून करुन फरार झालेल्या संशयिताला त्याच रात्री सांजुझे आरियल परिसरातून अटक केली होती. संशयिताने पत्नी दुसऱ्याकडे संबंध ठेवत असल्याचा संशय घेऊन हा खून केल्याची कबुली दिली असून यात किती तथ्य आहे याची चौकशी मायणा कुडतरी पोलिस करीत आहे. संशयित गुलशन तिरके याला आज रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

जखमी अवस्थेत पडलेल्या बासंतीला शेजाऱ्यांनी त्वरित मडगाव जिल्हा इस्पितळात दाखल केले असता, तिचे निधन झाले. याप्रकरणी मायणा कुडतरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केल्यावर पोलिसांनी संशयिताचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिस सांजुझे आरियल परिसरात संशयिताचा शोध घेत असताना भाड्याच्या खोलीच्या दोन किलोमीटर अंतरावरुन पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. गुलशन हा मुळचा झारखंड येथील असून तो खाणीच्या क्रशनवर काम करीत आहे. पोलिसांनी त्याला अटक केल्यावर त्याच्या तीन वर्षीय मुलाला नातेवाईकाच्या ताब्यात केले. संशयितावर पोलिसांनी भादंसंच्या 302 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

DJ चा आवाज, लग्नाचा जल्लोष अन् अचानक आगीचे भयानक लोट! रिसेप्शन पार्टीत 22 जणांचा होरपळून मृत्यू, थरकाप उडवणारा Watch Video

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

College Student Election: विद्यार्थी निवडणुकांत सरकारी हस्तक्षेप? NSUIचा गंभीर आरोप; कुमार गवळी म्हणाले, 'दबाव आणला जातोय'

SCROLL FOR NEXT