चारित्र्याच्या संशयावरुन ‘त्याने’ केली पत्नीची हत्या

पत्नीवर हल्ला करून फरार झालेल्या संशयिताला मायणा कुडतरी पोलिसांनी (Police) गुरुवारी रात्री अटक केली.
Crime
CrimeDainik Gomantak

सासष्टी: गोव्यात (Goa) महिलांचे खून व खुनी हल्ले होण्याच्या घटनांची शृंखला चालूच असून काल गुरुवारी चारित्र्याचा संशय घेऊन वयलेमळ सांजुझे आरियलयमध्ये पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चाकूने वार करून गुलशन तिरके याने बासंती तिरके हिचा खून केला. पत्नीवर हल्ला करून फरार झालेल्या संशयिताला मायणा कुडतरी पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली.

गोव्यात दिवसेंदिवस खुनांच्या घटनांमध्ये वाढ होत असून, यंदाच्या वर्षाला खूनाचा आकडा २०वर पोहचला आहे. राज्यात वाढणाऱ्या खूनाच्या घटनांमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे दिसून येत आहे. मायणा कुडतरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलशन तिरके आणि बांसती तिरके हे परप्रांतीय जोडपे आपल्या तीन वर्षीय मुलासह सांजुझे आरियल येथील एका भाड्याचा खोलीत राहत होते. दोन वर्षांपूर्वी एका अपघातात गुलशन याला उजवा हात गमवावा लागला होता. आपल्यास अपंगत्व आल्याने पत्नी दुसऱ्याकडे संबंध ठेवत असल्याचा त्याला संशय आला व याचा कारणावरून दोघांमध्ये गुरुवारी वाद झाला. या वादात पती गुलशन तिरके याने रागाच्या भरात चाकूने पत्नी बासंतीच्या पोटात वार करून तिला गंभीर स्वरुपी जखमी केले व आपल्या तीन वर्षीय मुलाला घेऊन तेथून फरार झाला.

Crime
हणजुणात रेस्टॉरंटला भीषण आग, पाच लाखांचे झाले नुकसान

जखमी अवस्थेत पडलेल्या बासंतीला शेजाऱ्यांनी त्वरित मडगाव जिल्हा इस्पितळात दाखल केले असता, तिचे निधन झाले. याप्रकरणी मायणा कुडतरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केल्यावर पोलिसांनी संशयिताचा शोध घेण्यास सुरवात केली. पोलिस सांजुझे आरियल परिसरात संशयिताचा शोध घेत असताना भाड्याच्या खोलीच्या दोन किलोमीटर अंतरावरुन पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. गुलशन हा मुळचा झारखंड येथील असून, तो खाणीच्या क्रशरवर काम करीत आहे. पोलिसांनी त्याला अटक केल्यावर त्याच्या तीन वर्षीय मुलाला नातेवाईकांच्या ताब्यात दिले. संशयितावर पोलिसांनी भादंसंच्या 302 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. मायणा कुडतरीचे पोलिस निरीक्षक सागर एकोस्कर पुढील तपास करीत आहे.

महिलांवर होतात खुलेआम हल्ले

आगोंदा पंचायत क्षेत्रात 16 ऑक्टोबर रोजी अल्फ्रेड परेरा याने सोनिया मोंतेरो हिच्यावर गोळ्या झाडून हत्या केली होती. फोंडा येथे 16 ऑक्टोबर रोजी जीवन कामत आणि मंगला कामत या सख्ख्या बहिणींचा खून केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी डिचोली येथील संशयित महादेव घाडी यांना अटक केली आहे. 19 ऑक्टोबर रोजी शिवोलीत एक्टारिया टिटोवा हिचा खून केल्याप्रकरणात पोलिसांनी डॅनिस याला अटक केली. राज्यात महिलांच्या खुनाच्या घटनांमध्ये वाढ होत असून महिलांवर खुलेआम खुनी हल्ले होत आहेत.

Crime
मांद्रेत दुकानाला आग; दहा लाखांचे नुकसान

यंदाच्या वर्षात आतापर्यंत 20 खुनाच्या घटना : गोव्यात यंदाच्या वर्षाला 20 खून झाले आहेत. यात 12 पुरुष, 7 स्त्रिया व एका बालकाचा समावेश आहे. 1 नोव्हेंबर रोजी फातोर्डा परिसरात दोडामार्ग येथील परशुराम गावस याने डिचोली येथील रहिवासी सुचिता गावकर हिच्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर मुलाने आत्महत्या केली. 30 ऑक्टोबर रोजी आकाश दीक्षित या युवकाने आई अंजली दीक्षित ही अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यास दबाव आणत असल्याने स्क्रू डायवरने हल्ला करून खून केला होता. 28 ऑक्टोबर रोजी नावेली परिसरात मामानेच भाची जेनिफर कदहट्टी हिच्या पोटात सुरा खुपसून खून केला होता तर, या प्रकरणी पोलिसांनी शरीफ शेख याला अटक केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com