Section 144 Imposed In The periphery of Mopa Airport: काळी-पिवळी टॅक्सीसाठी स्वतंत्र काउंटर द्यावे तसेच, मोपासाठी जमीन गमावलेल्या नागरिकांना टॅक्सी नोंदणीसाठी प्राथमिकता द्यावी, यासाठी 'टुगेदर फॉर पेडणेकर' या बॅनरखाली मागील काही दिवसांपासून आंदोलनचा इशारा देण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर टॅक्सी चालकांनी बंद पुकारला असून, मोपाकडे जाणारा रस्ता बॉल्क करण्याचा इशारा दिला आहे.
त्यामुळे मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.
उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे यांनी मंगळवारी रात्री उशीरा याबाबत आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, सुकेकुळण जंक्शन, धारगळ (एनएच-66) ते मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा ते विमानतळाच्या 500 मीटर हद्दीत, तसेच, नागझर, वरखड, उगवे, मोपा, चांदेल आणि कासारवर्णे या गावात कलम 144 अंतर्गत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
आदेशानुसार, या परिसरात पाच व पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. तसेच, त्यांना अग्निशस्त्र, चाकू, तलवार किंवा यासारखे शस्त्र जवळ बाळगता येणार नाही. याशिवाय लाऊडस्पीकर लावणे, घोषणा देणे तसेच, फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे.
मंगळवारी (दि.02) जारी करण्यात आलेले हे जमावबंदीचे आदेश पुढील 60 दिवसांच्या कालावधीसाठी लागू असतील असे आदेशात म्हटले आहे.
या आदेशातून लोकसेवक, लग्न समारंभ आणि अंत्यविधी यांना सूट देण्यात आली आहे. तसेच, कोणत्याही महत्वाच्या कारणासाठी ज्याची रितसर लेखी परवानगी घेण्यात आली आहे.
ग्रीन फिल्ड मोपा टॅक्सी संघटना आणि मोपा स्थानिक टॅक्सी संघटना यांनी बंदची घोषणा केली असून, मोपाकडे जाणारा मार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे.
यामुळे मोपाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असून, प्रवासी व सामान्य नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.