Crime News  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोव्यात अज्ञात मृतदेहाचे गुपचूप दफन, कुर्टीत खळबळ; घातपाताचा संशय

Curti Khandepar Crime: कुर्टी-खांडेपार पंचायतीच्या अखत्यारितील दीपनगर येथे कब्रस्तानात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह गुपचूप दफन केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पंचायतीची परवानगी न घेताच हा मृतदेह पुरल्यामुळे सरपंच अभिजीत गावडे यांनी फोंडा पोलिस स्थानकात तक्रार नोंदविली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mysterious Burial in Dipnagar Curti Khandepar Cemetery Sparks Investigation

फोंडा: कुर्टी-खांडेपार पंचायतीच्या अखत्यारितील दीपनगर येथे कब्रस्तानात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह गुपचूप दफन केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पंचायतीची परवानगी न घेताच हा मृतदेह पुरल्यामुळे सरपंच अभिजीत गावडे यांनी फोंडा पोलिस स्थानकात तक्रार नोंदविली आहे. त्यामुळे या प्रकाराविषयी संशय व्यक्त केला जात आहे.

उपलब्ध माहितीनुसार कुर्टी-खांडेपार पंचायतीने हिंदू, ख्रिश्‍चन व मुस्लीम समाजासाठी स्मशानभूमी आरक्षित केली आहे. एकाच ठिकाणी असलेल्या या स्मशानभूमीचा ताबा पंचायतीकडे आहे. वास्तविक या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करायचे असतील तर पंचायतीला आधी कळवावे लागते. मात्र, शुक्रवारी संध्याकाळी चार ते साडेचार या वेळेत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कब्रस्तानात गुपचूपपणे पुरल्याचे उघड झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

ही स्मशानभूमी कुर्टी - खांडेपार पंचायत क्षेत्रापुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे हा मृतदेह उसगाव किंवा धारबांदोडा भागातील असावा, असा कयास व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, गुपचूपपणे मृतदेह दफन करण्यामागे नेमके काय कारण आहे, याची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी पंचायतीतर्फे करण्यात आली आहे.

कुलूप गायब, प्रवेशद्वारही खुलेच

पंचायतीने या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या वाटेवर प्रवेशद्वार उभारून त्याला कुलूप ठोकले होते; पण कुलूप सध्या गायब असून प्रवेशद्वारही सताड उघडे ठेवले जाते. त्यामुळे हे काम मुद्दाम कुणी तरी करत असावे, असा कयास व्यक्त करण्यात येत आहे.

दफनभूमीतील सीसीटीव्ही कॅमेरे फोडले

मुस्लीम समाजासाठीच्या कब्रस्तानात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे अज्ञातांनी फोडले आहेत. त्यामुळे या भागात त्यादिवशी नेमके काय घडले, त्याचा अंदाज लागणे कठीण बनले आहे. याचीही तक्रार पोलिस ठाण्यात केली आहे.

स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण

सध्या या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच स्मशानभूमीच्या जमिनीवरही अतिक्रमण करण्यात आले आहे. या ठिकाणी राहणाऱ्या काहीजणांनी स्मशानभूमीतच घरांचा विस्तार केला आहे. ग्रामस्थांकडून हा विषय सातत्याने ग्रामसभेत उपस्थित करण्यात येतो. त्यानुसार पंचायतीने ‘डिमार्केशन’साठी कार्यवाही सुरू केली आहे. त्यानंतरच कुणी किती अतिक्रमण केले आहे ते स्पष्ट होईल, असे पंचायत प्रतिनिधींकडून सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT