Margao Crime: मडगाव पालिकेतील 'त्या' कर्मचाऱ्यावर लवकरच कारवाई? तीन पोलिस पथके मागावर

Margao Municipal Council: मडगाव पालिकेला सोपो करातून आलेले १७ लाख रुपये परस्‍पर आपल्‍या खात्‍यात वळविण्‍याचा आरोप असलेल्‍या आणि त्‍यामुळे सध्‍या निलंबित करण्‍यात आलेला मडगाव पालिकेचा एलडीसी योगेश शेटकर याला सेवेतून बडतर्फ करता येणे शक्‍य आहे का, याबद्दल मडगाव पालिकेने विचार सुरू केला आहे.

Yogesh ShetkarDainik Gomantak
Published on
Updated on

Margao Municipal Council Yogesh Shetkar Fraud Case

मडगाव : मडगाव पालिकेला सोपो करातून आलेले १७ लाख रुपये परस्‍पर आपल्‍या खात्‍यात वळविण्‍याचा आरोप असलेल्‍या आणि त्‍यामुळे सध्‍या निलंबित करण्‍यात आलेला मडगाव पालिकेचा एलडीसी योगेश शेटकर याला सेवेतून बडतर्फ करता येणे शक्‍य आहे का, याबद्दल मडगाव पालिकेने विचार सुरू केला आहे. तसेच यासंबंधांत कायदेशीर सल्‍लाही मागितला आहे.

मडगाव येथील फेस्‍ताच्‍या फेरीतून आलेले १७ लाख रुपये शेटकर याने हडप केल्‍याचा त्याच्यावर आराेप आहे. त्‍यामुळे तीन महिन्‍यांपूर्वी त्‍याला सेवेतून निलंबित करण्‍यात आले होते. निलंबनाच्‍या काळात त्‍याने मडगाव पालिकेत हजेरी द्यावी, अशी स्‍पष्‍ट सूचना असतानाही शेटकर याने या आदेशाची पर्वा न करता आजपर्यंत तो कामावर रुजू झाला नाही.

यासंदर्भात मडगाव पालिकेचे नगराध्‍यक्ष दामोदर शिरोडकर यांना विचारले असता, या १७ लाखांपैकी तीन लाख रुपये मडगाव पालिकेच्‍या तिजोरीत भरण्यात आले आहेत. राहिलेले १४ लाख रुपये कसे वसूल करावेत यावर आम्‍ही भर दिला आहे. योगेश शेटकर याला सेवेतून बडतर्फ करणे शक्‍य आहे का यावर आम्‍ही कायदेशीर सल्‍ला मागितला आहे. योग्य सल्ल्यानुसार आम्ही पुढील कारवाई करणार आहोत. त्‍याच्‍या खात्‍यात किती पैसे आहेत याचीही तपासणी सुरू आहे. भविष्‍य निर्वाह निधी आणि अन्‍य मार्गातून ही वसुली करता येणे शक्‍य आहे का यावर आमची भर आहे, असे त्‍यांनी सांगितले.

Margao Municipal Council: मडगाव पालिकेला सोपो करातून आलेले १७ लाख रुपये परस्‍पर आपल्‍या खात्‍यात वळविण्‍याचा आरोप असलेल्‍या आणि त्‍यामुळे सध्‍या निलंबित करण्‍यात आलेला मडगाव पालिकेचा एलडीसी योगेश शेटकर याला सेवेतून बडतर्फ करता येणे शक्‍य आहे का, याबद्दल मडगाव पालिकेने विचार सुरू केला आहे.
Goa Monsoon: गोव्यात 106 टक्के अधिक पाऊस! हवामान बदलाने चिंता; थंडी लांबली

तीन पोलिस पथके कार्यरत

फरार असलेल्‍या योगेश शेटकर याच्‍याविरोधात मडगाव पाेलिसांत गुन्‍हा नोंद केला असून मडगाव पोलिसांनी त्‍याच्‍या विरोधात दोनवेळा लुकआऊट नोटीस जारी केली. मात्र, अजूनही तो त्यांच्या हाती लागलेला नाही. योगेश शेटकर याला पकडण्‍यासाठी एकूण तीन पोलिस पथके कार्यरत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी ही पथके कार्यरत आहेत. संशयित लवकरच पोलिसांच्‍या तावडीत सापडेल, अशी शक्‍यता मडगाव पोलिसांनी व्‍यक्‍त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com