Secret behind interview of former Governor of Goa Satyapal Malik Dainik Gomantak
गोवा

सत्यपाल मलिक यांच्या मुलाखतीमागील गुपीत

मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मुलाखत द्यायला पत्रकार राजदीप सरदेसाई यांचीच निवड का केली आणि राजभवनात बसून ही मर्मभेद मुलाखत कशी काय दिली

दैनिक गोमन्तक

मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) यांनी मुलाखत द्यायला पत्रकार राजदीप सरदेसाई यांचीच निवड का केली आणि राजभवनात बसून ही मर्मभेद मुलाखत कशी काय दिली, याची चर्चा सध्या प्रसार माध्यमांमध्ये सुरू आहे. राज्यपालांना अशा पद्धतीची मुलाखत देण्यात आली, ती प्रकाशित होईपर्यंत कुणाला जाणू द्यायचे नव्हते.

भाजपच्या शागीर्द पत्रकारांना मुलाखत दिली असती तर आधीच तिची वाच्यता होऊन राज्यपालांना ती मागे घ्यावी लागण्याची शक्यता होती. अशी एक वदंता आहे, की भाजपच्या पक्षश्रेष्ठींनीच राज्यपालांना फूस दिली. परंतु निवडणुका दोन महिन्यांवर आल्या असताना गोव्यात धोका पत्करणे भाजपला शक्य नाही. गोव्यात दोन महिन्यांबद्दलही शक्य नाही. त्यामुळे राज्यपालांनीच हे एक अजब धाडस करून मुख्यमंत्र्यांवर कुरघोडी करण्याचा व आपल्या अपमानाचा वचपा काढला, असे असू शकते.

गोवा राज्याचे माजी व मेघालयाचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गोव्यातील कोविड काळातील भ्रष्टाचारासंदर्भात गौप्यस्फोट केल्यानंतर राज्यातील सात पक्ष आक्रमक झाले आहेत. आणि आता गोवा सावंत सरकारच्या राजीनाम्याची मागणी केरत आहे. विद्यमान राज्यपालांनी अशा पद्धतीने गोवा राज्य सरकार व तेही आपल्याच पक्षावर असा घणाघाती आरोप करण्याची ही पहिलीच वेळ असून, सत्य बोलण्यास आपण कचरत नाही. कारण आपण लोहियावादी आहोत असे ठाम मतही व्यक्त केले.

मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची काल सडेतोड मुलाखत ‘इंडिया टुडे’ साठी राजदीप सरदेसाई यांनी घेतली. तेथे त्यांनी शेतकरी आंदोलनाबरोबर काश्‍मीर व गोव्याच्या आपल्या कारकीर्दीवरही रोखठोक मते व्यक्त केली.

आता मुद्दा असा आहे की, सत्यपाल मलिक यांचे हे आरोप केंद्रीय गृहखात्याला मान्य नसतील, तर त्यांची गच्छंती करणे हाच पर्याय राहातो. त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यास चालढकल झाली, तर मात्र त्यांच्या आरोपात तथ्य आहे, असा अर्थ निघेल आणि मुख्यमंत्र्यांवर पदत्याग करण्याची वेळ येईल. सत्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपांत तथ्य असो वा नसो, प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणूक लढवली जाईल, अशी निःसंदिग्ध ग्वाही भाजपाने दिल्यानंतर लगेच हे आरोप जाहीरपणे केले असल्याने त्यांतले गांभीर्य अधिकच गडद झाले आहे.

गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी प्रमोद सावंत सरकारचे अनेकवेळा कान उपटले व राज्यकारभाराबद्दल जाहीरपणे नापसंती व्यक्त केली होती. त्याबद्दल त्यांना गोव्यातून (Goa) अपमानित होऊन जावे लागले होते. सावंत सरकारने कोविड प्रश्न अत्यंत निष्काळजीपणाने हाताळला, इतकेच नव्हे तर या काळात धान्य वाटपात भ्रष्टाचार झाला व एकूणच सर्व क्षेत्रात तेथे भ्रष्टाचाराचा भस्मासुर माजला होता, असा जाहीर आरोप मलिक यांनी केला आहे. यावर पत्रकारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विचारले असता त्यांनी बोलण्याचे टाळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT