गोवा सरकारची तिजोरी रिकामी असताना नवे राजभवन बांधण्याचा अट्टहास का?

"गोव्यात भ्रष्टाचाराबद्दल आवाज उठविल्यामुळेच माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना हटविले"
"गोव्यात भ्रष्टाचाराबद्दल आवाज उठविल्यामुळेच मला हटविले" गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक
"गोव्यात भ्रष्टाचाराबद्दल आवाज उठविल्यामुळेच मला हटविले" गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिकDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) यांनी प्रमोद सावंत सरकारचे (Pramod Sawant Government) अनेकवेळा कान उपटले व राज्यकारभाराबद्दल जाहीरपणे नापसंती व्यक्त केली होती. त्याबद्दल त्यांना गोव्यातून (Goa) अपमानित होऊन जावे लागले होते. त्याचा आज त्यांनी पूरेपूर वचपा काढताना सावंत सरकारने कोविड प्रश्न अत्यंत निष्काळजीपणाने हाताळला, इतकेच नव्हे तर या काळात धान्य वाटपात भ्रष्टाचार झाला व एकूणच सर्व क्षेत्रात तेथे भ्रष्टाचाराचा भस्मासुर माजला होता, असा जाहीर आरोप केला आहे. यावर पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बोलण्याचे टाळले.

"गोव्यात भ्रष्टाचाराबद्दल आवाज उठविल्यामुळेच मला हटविले" गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक
गोव्यात भाजपची दडपशाही, तृणमूल काँग्रेसच्या कार्यक्रमांवर बंदी!

विद्यमान राज्यपालांनी अशा पद्धतीने राज्य सरकार व तेही आपल्याच पक्षावर असा घणाघाती आरोप करण्याची ही पहिलीच वेळ असून, सत्य बोलण्यास आपण कचरत नाही. कारण आपण लोहियावादी आहोत. आपल्याला पंतप्रधानांनी घरी जायला सांगितले तरी आपण सरळ घरी निघून जाऊ, असे ते बिनदीक्कतपणे म्हणाले. मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची आज सडेतोड मुलाखत ‘इंडिया टुडे’ साठी राजदीप सरदेसाई यांनी घेतली. तेथे त्यांनी शेतकरी आंदोलनाबरोबर काश्‍मीर व गोव्याच्या आपल्या कारकीर्दीवरही सडेतोड मते व्यक्त केली. ते म्हणाले, गोव्यातील सावंत सरकारने कोरोनाचा प्रश्न अत्यंत बेजबाबदारपणे हाताळला व लोकांना धान्य वाटताना मोठा गैरव्यवहार झाला.

नवे राजभवन बांधण्याचा अट्टहास का?

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना सध्याचा वारसा काबो राजनिवास पाडून तेथे नवीन राजभवन उभारायचे आहे त्यासाठी मी परवानगी नाकारली होती. मी राजभवनातील एका छोट्याशा खोलीत राहू शकतो, राज्य सरकारची तिजोरी रिकामी असताना नवे राजभवन बांधण्याचा अट्टहास का? ती गोष्टही पंतप्रधानांच्या कानावर घातली होती. मला माहीत आहे पंतप्रधान भ्रष्टाचाराच्या विरोधात आहेत. परंतु ज्यांना विचारायला हवे, त्यांच्याकडून पंतप्रधानांनी माहिती घेतली नाही. पंतप्रधानांची अनेकवेळा दिशाभूल केली जाते, असेही मलिक म्हणाले.

"गोव्यात भ्रष्टाचाराबद्दल आवाज उठविल्यामुळेच मला हटविले" गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक
तृणमूलच्या ‘त्या’ कार्टूनवर भाजपची आक्रमक भुमिकी

मी कुणाला घाबरत नाही

मी लोहियावादी आहे आणि भ्रष्टाचाराबद्दल मला प्रचंड तिटकारा आहे, असे सांगून मेघालयाचे राज्यपाल पुढे म्हणाले, मला कुणाची कधीच भीती वाटत नाही. ईडी किंवा आयकर यांना तर मी मुळीच भीक घालत नाही. जे कोणी गैरव्यवहार करतात त्यांनाच त्यांची भीती वाटू शकते. दुर्दैवाने आज देशात जे काही चालले आहे, त्याविरुद्ध बोलण्याची हिंमत कुणी दाखवत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com