Second Complaint Booked On Doctor for Molesting women in Margao Goa during medical check up Dainik Gomantak
गोवा

Margao Doctor Crime News : मडगावातील 'त्या' डॉक्टराविरोधात विनयभंगाची दुसरी तक्रार

‘आयएमए’ संस्थेच्या मडगाव येथील डॉक्टरांचा संशयित डॉक्टरला पाठिंबा

गोमन्तक डिजिटल टीम

Second Complaint Booked On Doctor for Molesting Women In Margao: 77 वर्षीय डॉक्टरने आपला विनयभंग केल्याची तक्रार एका युवतीने मडगाव पोलिसांत दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करुन संशयिताला चौकशीसाठी सोमवारी पोलिस स्थानकांत बोलावले.

दरम्यान, संशयित डॉक्टराविरुद्ध आणखी एका तरुणीने विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. तपासणीसाठी गेली असता डॉक्टरने स्पर्श व अश्लील कमेंट करीत विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मडगाव येथील संशयित डॉक्टराविरुद्ध विनयभंगाची पहिली तक्रार एका 27 वर्षीय युवतीने दाखल केली होती. बुधवारी पिडीत युवतीस ताप आल्याने ती तपासणीसाठी एका डॉक्टरकडे गेली होती. यावेळी डॉक्टरने चुकीच्या पध्दतीने स्पर्श करण्यास सुरुवात केल्याची तक्रार युवतीने केली आहे.

आज संशयित डॉक्टरला पाठिंबा दर्शवण्यासाठी ‘आयएमए’ संस्थेच्या मडगाव येथील डॉक्टरांनी मडगांव पोलिसांत धडक दिली.

पोलिसांनी हे प्रकरण योग्य प्रकारे हाताळावे. केवळ पैसे उकळण्यासाठी हा बनाव केला असल्याने ज्या युवतीने डॉक्टरांची प्रतिमा मलिन करण्यासाठी तक्रार केली व ज्या कोणी डॉक्टरांकडून पैशांची मागणी केली असेल त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन त्यांनी पोलिस उपअधिक्षक संतोष देसाई यांना दिले.

यावेळी उपअधिक्षक देसाई यांनी आपण या संपुर्ण घटनेची कसुन निःपक्षपातीपणे चौकशी करणार आहे असे आश्वासन सदस्यांना दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: डिचोलीत जिल्हा पंचायत निवडणुक मतदानाला सुरुवात!

Goa Politics: 'भाजप-मगोप युती विरोधकांना क्लिन स्वीप करेल, राज्यात यापुढे तिहेरी इंजिन कार्यरत होईल'! CM सावंतांनी व्यक्त केला विश्वास

Amulya Vessel: भारतीय तटरक्षक दलाच्या ‘अमूल्य’चे जलावतरण! किनारपट्टींची सुरक्षा होणार मजबूत, Watch Video

Goa Winter: धुक्यात हरवला गोवा! हुडहुडी वाढली; पुढचे 2 दिवस कसे राहणार हवामान? वाचा..

Goa Politics: खरी कुजबुज; मेस्सी गोव्यात आला असता तर !

SCROLL FOR NEXT