GMC Goa: गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय (Goa Medical College And Hospital) दररोज सरासरी पंधरा गंभीर अपघातांच्या घटना हाताळत आहे. रूग्णालयातील ऑर्थोपेडिक विभाग आठ ते दहा रूग्णांवर उपचार करत आहे.
गोमेकॉतील ऑर्थोपेडिक विभागाचे सहाय्यक प्राध्यापक जिलो डीमेलो यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला याबाबत माहिती दिली आहे. गोव्यात वाढत्या अपघातांच्या घटनांवर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
राज्यात चारचाकी आणि दुचाकी वाहनांची संख्या वाढली आहे. याशिवाय राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या यामुळे रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ पाहायला मिळते. अलिकडच्या काळात वाढलेल्या अपघातांच्या घटना यामुळे सरकार आणि पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
एक आठवड्यापूर्वी बाणस्तारी येथे झालेल्या भीषण अपघातानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले असले तरी मद्यप्राशन करून वाहन चालवण्याच्या घटना दरदिवशी समोर येत आहेत.
मागील तीस वर्षातील आकडेवारी पाहता अलिकडे राज्यात अपघातांचे प्रमाण वाढल्याचे डॉ. डीमेलो यांनी नमूद केले आहे.
गोमेकॉत उपचारासाठी येणाऱ्या काही रूग्णांना दक्षिण जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात येते. असे डीमेलो म्हणाले.
मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवण्याचे प्रमाण वाढल्याने अपघातांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली आहे. अपघातांमध्ये जखमींच्या हातापायाची हाडे तुटण्यासारखी प्रकरणे समोर आली आहेत. असे डीमेलो म्हणाले.
तसेच, 108 या आपात्कालिन वैद्यकीय सुविधा देणाऱ्या रूग्णवाहिकेमुळे अपघातस्थळी रूग्णांना तात्काळ उपचार मिळण्यास मदत होत आहे. तसेच, गोमेकॉत अपघातसंबधित सेवांसाठी तातडीक वैद्यकीय सेवा विभाग 24 तास खुला असल्याचे डीमेलो यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.