Galgibaga Beach Dainik Gomantak
गोवा

Galgibaga Beach: गालजीबाग किनाऱ्याकडे सागरी कासवांची पाठ; यंदा संख्या घटण्याची शक्यता

आगोंद किनाऱ्यावर दोन ऑलिव्ह रिडले कासवांनी घातली अंडी

दैनिक गोमन्तक

Galgibaga Beach: आगोंद किनाऱ्यावर हल्लीच दोन ऑलिव्ह रिडले सागरी कासवांनी अंडी घातली. मात्र, खास सागरी कासवांसाठी आरक्षित असलेल्या गालजीबाग किनाऱ्यावर अद्याप एकाही सागरी कासवाचे आगमन झालेले नाही. गेल्या वर्षी आगोंद किनाऱ्यावर मागील २५ वर्षांच्या कालावधीत सर्वाधिक ६८ सागरी कासवांचे आगमन होऊन त्यांनी सात हजार अंडी घातली होती.

गालजीबाग किनाऱ्यावर ३० सागरी कासवांचे आगमन होऊन २४ घरट्यांतून पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. आगोंद, गालजीबाग या कासव संवर्धन केंद्रात गेल्या वर्षी सागरी कासवांचे आगमन शंभरीपर्यंत पोचले होते. गालजीबागचा संपूर्ण किनारा व आगोंद किनाऱ्याचा काही भाग कासवांच्या संवर्धनासाठी आरक्षित ठेवला आहे.

आठ रक्षकांची नेमणूक : गालजीबाग किनाऱ्यावर वन खात्याने सुमारे तीन हजार चौरस मीटर जमीन सागरी कासव संवर्धन केंद्रासाठी आरक्षित केली आहे. दरवर्षी गालजीबाग व आगोंद किनाऱ्यावर हंगामी टेहळणी कुटिरे उभारण्यात येतात. सागरी कासवाच्या संवर्धन व संरक्षणासाठी दोन्ही किनाऱ्यांवर वन खात्यातर्फे दरवर्षी आठ रक्षकांची नेमणूक करण्यात येते.

...असे होते कासव संवर्धन

आगोंद वगळता दक्षिण गोव्यात कोणत्याही किनाऱ्यावर कासवांचे आगमन होऊन त्यांनी अंडी घातल्यास ती संरक्षणासाठी गालजीबाग किनाऱ्यांवर स्थलांतरित केली जातात.

एका घरट्यातून पिल्ले बाहेर येण्यास सुमारे ४५ ते ५० दिवसांचा कालावधी लागतो.

ज्या किनाऱ्यावर कासवांच्या पिल्लांचा जन्म होतो, ती पिल्ले वयात आल्यानंतर त्याच किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी परत येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

Goa Island: बेटे आमची, गोव्याला देणार नाही; मालकीसाठी धडपडणाऱ्या कर्नाटकची कोलांटी उडी,केवळ माजाळीजवळील बेटाबाबत वाद

SCROLL FOR NEXT