mv empress 
गोवा

गोव्यात सागरी पर्यटन हंगामाला सुरुवात; 1893 पर्यटक घेऊन 'एमव्ही एम्प्रेस' मुरगाव बंदरात दाखल

सागरी पर्यटन हंगामाला दमदार सुरुवात; पहिले जहाज दाखल, ‘एमव्ही एम्प्रेस’मधून आलेल्या १८९३ पर्यटकांची गोवा भ्रमंती

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: ‘एमव्ही एम्प्रेस’ या देशांतर्गत पर्यटक जहाजाच्या बुधवारी (ता.१८) झालेल्या आगमनाने गोव्याच्या २०२४-२५ या वर्षाच्या सागरी पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. हे पर्यटक जहाज १३१५ प्रवासी व ५७८ कर्मचारी वर्ग मिळून १८९३ पर्यटकांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल झाले. पर्यटकांचे स्वागत प्रायोजक जे. एम. बक्षी शिपिंग कंपनीद्वारे करण्यात आले.

२०२४-२५ या सागरी पर्यटन हंगामातील पहिले पर्यटक जहाज बुधवारी सकाळी ९ वाजता मुरगाव बंदरात दाखल झाले. जे. एम. बक्सी या कंपनीच्या प्रायोजनाखाली दाखल झालेल्या एमव्ही एम्प्रेस या देशांतर्गत जहाजातून १३१५ प्रवासी व ५७८ कर्मचारी वर्ग मिळून १८९३ पर्यटक दाखल झाले.

मुरगाव बंदरात स्वागत

मुरगाव बंदरात उतरलेल्या या पर्यटकांनी नंतर गोवा भ्रमंतीसाठी कूच केली. यावेळी पर्यटकांना गोवा भ्रमंतीला नेण्यासाठी पर्यटक बसेस तसेच पर्यटक टॅक्सी मुरगाव हार्बर येथे तैनात होत्या. पर्यटकांनी मिळेल त्या वाहनाने गोवा भ्रमंतीसाठी कूच केली व गोव्याच्या सौंदर्यसृष्टीचा आनंद लुटला व दुपारी परत मुरगाव बंदरात येऊन जहाजात गेले.

मुंबई मार्गे गोव्यात दाखल झालेल्या या पर्यटकांचे स्वागत प्रायोजक जे. एम. बक्षी या शिपिंग कंपनीद्वारे करण्यात आले. संध्याकाळी हे जहाज पर्यटकांना घेऊन अगत्ती लक्षद्वीप येथे जायला रवाना झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT