Sea Swimming  Dainik Gomantak
गोवा

Sea Swimming : सावधान! वादळाची शक्यता; समुद्रात पोहणे टाळा

Sea Swimming : तासी ३०ते ४० किमी वेगाने वारे वाहणार; यलो अलर्ट जारी

गोमन्तक डिजिटल टीम

Sea Swimming :

पणजी, भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अवकाळी पावसाच्या अंदाजानुसार, राज्य नियुक्त जीवरक्षक संघाने पर्यटक तसेच स्थानिकांना समुद्रकिनाऱ्यांवर भेट देताना खबरदारी राखण्यास सावध केले आहे.

भारतीय हवामान खात्याने राज्यात गुरुवारी येलो अलर्ट जारी केला आहे. २६ मे पर्यंत गोव्याच्या किनारपट्टीवर ३० ते ४० कीमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

अनपेक्षित हवामानाचा परिणाम किनारी भागावर होण्याची शक्यता आहे. दृष्टी मरीनने लोकांना समुद्रकिनाऱ्यांना भेट देताना हवामानाची माहिती लक्षात घेऊन सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

‘दृष्टी’ची सज्जता

समुद्रकिनारे, मये तलाव, दूधसागर धबधब्यावर तैनात.

जीवरक्षक हे प्रथमोपचार किट, सर्फबोर्ड, रेडिओ संच, सीपीआर आणि एइडी मशीनसह सुसज्ज.

प्रत्येक टॉवरमध्ये एक किंवा दोन

जेट स्की.

सुरक्षिततेसाठी सूचना

१ जल क्रियाकलाप टाळा: पाऊस, विजांचा कडकडाट किंवा गडगडाटी वादळाच्या काळात पोहणे, जलक्रीडा टाळा.

२ चेतावणीकडे लक्ष द्या: हवामान सल्ला, आईएमडी आणि स्थानिक प्रशासनाच्या अपडेट्सकडे लक्ष द्या.

३ आश्रय शोधा: किनाऱ्यावर वादळी स्थितीत अडकल्यास ताबडतोब आश्रय घ्या. पण मोकळी जागा टाळा.

४ अपडेटेड रहा: हवामान बातम्यांचे निरीक्षण करा.

अचानक हवामानातील बदलांमुळे विशेषत: किनारपट्टी भागात वाढीव धोके निर्माण होतात. लाइफसेव्हर्स हाय अलर्टवर आहेत आणि या प्रतिकूल हवामानामुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत.

- नवीन अवस्थी,‘दृष्टी’ मरीनचे ग्रुप सीईओ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: ''टीम इंडियाला हलक्यात घेऊ नका, ते सहज हरवू शकतात", शोएब अख्तर घाबरला, पाकिस्तानला दिला 'हा' इशारा

Goa Crime: "कुत्र्यांना मारू नका" म्हटल्याने कॉन्स्टेबलची तरुणाला मारहाण, गुन्हा दाखल करण्यात पोलिसांची टाळाटाळ?

Suryakumar Yadav: 21 कोटींचं आलिशान घर, लक्झरी कार कलेक्शन...'सूर्या दादा'ची Net Worth ऐकून चक्रावून जाल

IND vs PAK: भारतानं पाकिस्तानविरूध्दच्या मॅचवर बहिष्कार टाकला तर? गुणतालिकेत उलथापालथ निश्चित, पाकचा राहील वरचष्मा

Viral Video: 'मनोहर पर्रीकर फिरायचे तसे तुम्हीही फिरत जा'; पुण्यात पाहणी दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना महिलेचा सल्ला Watch Video

SCROLL FOR NEXT