Goa: गोव्यातील फार्मा कंपन्यांसाठी पुणे, मुंबईत मुलाखती घेण्यावरुन वाद का झाला? विरोधकांनी उठवले रान

Controversy Over Jobs: गोव्यातील दोन फार्मा कंपन्यांनी नोकरभरतीसाठी मुंबई आणि पुण्यात मुलाखती आयोजित करण्यावरुन मोठा वाद झाला.
Controversy Over Jobs
Controversy Over JobsDainik Gomantak
Published on
Updated on

Controversy Over Jobs

औषध निर्मिती उद्योगात एक अग्रेसर राज्य म्हणून गोव्याची ओळख आहे. राज्यातील दोन फार्मा कंपन्यांच्या नोकरभरतीसाठी मुंबई आणि पुण्यात मुलाखती आयोजित करण्यात आल्या. यावरुन राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी रान उठवत सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली तसेच, हा गोमन्तकीयांना रोजगारापासून वंचित ठेवण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला.

गोव्यातील इंडोको रिमेडिज फार्मा कंपनीच्या विविध पदाच्या नोकरभरतीसाठी, 24 आणि 25 मे रोजी बोईसर येथे मुलाखती आयोजित करण्यात आल्याची जाहिरात कंपनीने प्रसिद्ध केली. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी यावर आक्षेप घेत कंपनी मुद्दाम गोमन्तकीयांना रोजगारापासून डावलत असल्याचा आरोप केला.

तसेच, याप्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तात्काळ हस्तक्षेप करुन गोवेकरांसाठी उभे राहण्याची विनंती केली. राज्यातील उद्योगांपासून स्थानिकांना फायदा (रोजगारासाठी) होणार नसेल तर, त्यांचा येथे असण्याचा उपयोग काय असा सवाल देखील सरदेसाई यांनी उपस्थित केला.

एवढेच नव्हे तर सरदेसाई यांनी मुख्य सचिव पुनित कुमार गोयल यांना पत्र लिहून खासगी क्षेत्रात स्थानिकांना टक्के आरक्षण देण्याची मागणी केली. तसेच, अशा कंपन्याविरुद्ध सरकारने कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

Controversy Over Jobs
Sea Turtle Conservation: कासव संवर्धन मोहिमेला मोरजी किनाऱ्यावर यश! 13,000 पिल्लांना सोडले समुद्रात

सरदेसाई पाठोपाठ रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर गोवा लोकसभा उमेदवार मनोज परब यांनी देखील या प्रकारावरुन भाजप सरकारवर टीका केली. राज्यातील फार्मा कंपन्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. भाजप सरकारने परप्रांतीयांना नोकऱ्या विकल्यात. स्थानिकांना नोकऱ्यांसाठी आपल्याकडे बळकट आरक्षण धोरण नाही. भाजपला केवळ इलेक्टोरल बॉन्ड आणि देणग्या याच्याशी घेणदेणं आहे, अशा शब्दात परब यांनी टीका केली.

बऱ्याच कंपन्यांचे प्लान्ट हेड बिगर गोमन्तकीय असल्याने ते स्वत:च्या राज्यातील उमेदवारांना नोकरीसाठी प्राधान्य देतात. इंडोकोचे प्लान्ट हेड आणि एचआर दोघेही बिगर गोमन्तकीय आहेत. परप्रांतीयांना नोकरी देण्याचा प्रकार त्वरीत बंद करावा नाहीतर त्यांना आरजीच्या प्रक्षोभाचा सामना करावा लागेल, असा इशाराही परब यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर कंपनीने मुलाखत केली रद्द

मुंबईत मुलाखती घेण्यावरुन झालेल्या वादानंतर अखेर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करत कंपनीला मुलाखत रद्द करण्यास भाग पाडले. कंपनीने तांत्रिक कारण देत बुधवारी सायंकाळी ही मुलाखत रद्द केल्याचे जाहीर केले.

Controversy Over Jobs
Naik Desai Of Cuncolim: कुंकळ्ळीचे नाईक देसाई नक्की कोण?

दुसऱ्या एका कंपनीची पुण्यात मुलाखतीसाठी जाहिरात

एका कंपनीमुळे झालेल्या वादावर पडदा पडत असतानाच दुसऱ्या एका कंपनीच्या नोकरीभरतीसाठी पुण्यात मुलाखती होत असल्याची जाहिरात समोर आली. इनक्युब इथिकल्स या फार्मा कंपनीत दोन पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यासाठी पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये येत्या 26 मे रोजी मुलाखती होत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

याबाबत आमदार विजय सरदेसाई यांनी पुन्हा सरकार आणि खासगी कंपन्यांवर निशाना साधत हा प्रकार थांबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यासाठी योग्य धोरण आवश्यक असल्याचे सरदेसाई म्हणाले. राज्यातील नोकऱ्यांबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी त्यांनी केली. यासह बँकांतील नोकऱ्यांबाबतही आवाज उठविणार असल्याचे सरदेसाई म्हणाले.

गोव्यातील औषध निर्मिती उद्योग

औषध निर्मिती उद्योगात गोवा एक अग्रेसर राज्य आहे. एका अहवालानुसार, राज्यातील फार्मा उद्योगाचे अंदाजे वार्षिक उत्पन्न 7,500 कोटी पेक्षा जास्त आहे. उद्योगात दरवर्षी सुमारे 15 टक्के वाढ नोंदवली जातेय. भारताच्या औषध उत्पादनात गोव्यातील फार्मा कंपन्या अंदाजे 10 टक्के योगदान देतात, अशी माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com