Scuba Diving Dainik Gomantak
गोवा

Vasco: स्कूबा डायव्हिंग करताना पर्यटकाचा दुर्देवी मृत्यू

आयलॅण्ड येथे समुद्रात स्कूबा डायव्हिंग करताना हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील पर्यटक मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Vasco: बेट आयलॅण्ड येथे समुद्रात स्कूबा डायव्हिंग करताना हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबई येथील पर्यटक प्रकाश मधुसूदन खैर यांचा मृत्यू झाला.

मुंबई येथील खैर कुटुंब शनिवारी कळंगुट येथून पर्यटक बोटीतून बेट आयलॅण्ड येथे समुद्रात स्कूबा डायव्हिंग करण्यासाठी आले होते.

यावेळी प्रकाश खैर यांना अस्वस्थ वाटू लागल्याने बोटीवरील कामगारांनी त्वरित बायणा किनाऱ्यावर प्राथमिक उपचारासाठी आणले. दृष्टी संस्थेच्या जीवरक्षकांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले.

नंतर 108 रुग्णवाहिका बोलावून त्यांना पुढील उपचारासाठी दाबोळी-चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी प्रकाश खैर (72) यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच मुरगाव पोलिसांनी रुग्णालयात जाऊन घटनेचा पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

Himachal Pradesh Landslide: हिमाचलमध्ये भीषण अपघात! चालत्या सुमोवर कोसळली दरड; 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

Israel Crime: इस्त्रायलमध्ये भारतीय नागरिकाची निर्घृण हत्या, रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; 31 वर्षीय संशयिताला अटक

SCROLL FOR NEXT