Mopa Airport: विमानतळावर टॅक्सी काउंटर सुरू करण्यासाठी टॅक्सीचालक करणार आंदोलन

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर काळ्या-पिवळ्या टॅक्सीधारकांना काउंटर सुरू करावा यासाठी आंदोलन होणार आहे.
Taxi| Mopa International Airport | Manohar Airport
Taxi| Mopa International Airport | Manohar Airport Dainik Gomantak

Mopa Airport: मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर काळ्या-पिवळ्या टॅक्सीधारकांना काउंटर सुरू करावा, तो मिळवणे हा स्थानिकांचा हक्क आहे. 2 तारखेपासून नागझर येथे सुरू होणाऱ्या आंदोलनास पूर्ण पाठिंबा असेल, असे पेडणे तालुका नागरिक समितीतर्फे आयोजित पत्रकार परिषद जाहीर केले. परिषदेला पेडणे तालुका नागरिक समितीचे समितीचे निमंत्रक ॲड. सदानंद वायंगणकर, अध्यक्ष भरत बागकर, उपाध्यक्ष महादेव पटेकर, सदस्य ॲड. जितेंद्र गावकर उपस्थित होते.

बागकर म्हणाले, या विमानतळासाठी सरकारने स्थानिक शेतकऱ्यांच्या शेती, बागायतीची जमीन ताब्यात घेतली. या मोबदल्यात स्थानिकांना नोकरीसाठी प्राधान्य देण्यात येईल, असे सांगितले होते, पण प्रत्यक्षात मात्र सरकारने आश्वासन देऊन लोकांचा विश्वासघात केला. सरकारने किमान मोपा विमानतळावर पेडणेतील युवकांना टॅक्सी व्यवसाय सुरू करण्यासाठी काउंटर उपलब्ध करायला हवा.

ॲड जितेंद्र गावकर म्हणाले, विमानतळावर टॅक्सी काउंटर हा कायम स्वरूपी आहे. त्यावर स्थानिक टॅक्सीधारकांचा हक्क अबाधित राहतील, पण ॲप योजना ही विश्वासार्हता नाही.

Taxi| Mopa International Airport | Manohar Airport
ISRO: 2023मध्ये इस्रोचे 'गगनयान' अंतराळात झेपावणार

ॲड. वायंगणकर म्हणाले, सध्याच्या सरकारला येथील जनतेचे आणि राज्याचे काही देणेघेणे नाही, हे म्हादई प्रश्नावरून दाखवून स्पष्ट झाले आहे. म्हादईप्रकरणी राज्याची फसवणूक झाली आहे. तशीच फसवणूक मोपा विमानतळ प्रकल्पात पेडणेवासीयांना नोकऱ्या देतो, म्हणून केली. आत्ता विमानतळावर आमच्या लोकांना टॅक्सी काउंटर हवा, तो त्यांचा हक्क आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com