Scrap Dump | File Photo  Dainik Gomantak
गोवा

Goa Fire: भीषण आगीत नावेलीतील भंगार अड्डा बेचिराख

मडगाव अग्निशमन दलाने आटोक्यात आणली आग

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Fire: चंद्रवाडा-फातोर्डा येथे काही दिवसांपूर्वी एका भंगार अड्ड्याला आग लागून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू होण्याचा प्रकार घडलेला असतानाच आता नागमोडेम-नावेली येथील एका भंगार अड्ड्याला भीषण आग लागली आणि संपूर्ण यार्ड बेचिराख झाला. ही घटना गुरुवारी (ता. 9) रात्री घडली.

मडगाव अग्निशमन दलाने पहाटेच्या सुमारास आग आटोक्यात आणली, तर सकाळी पुन्हा आग लागल्याने अग्निशमन दलाचे जवान नागमोडेमकडे परतले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या एकूण तीन बंबांचा वापर करण्यात आला.

घटनास्थळी असलेल्या एकाने माहिती देताना सांगितले की, भंगार अड्ड्यात आग पसरण्यापूर्वी संपूर्ण अंगणात ती लागली असण्याची शक्यता आहे. अनेक लोक रात्री उशिरा भंगार अड्ड्याजवळ बसतात. ते गेल्यानंतर या ठिकाणी आग लागली असावी.

या आगीची माहिती प्राप्त झाल्यानंतर पहाटे दीडच्या सुमारास अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. आग आटोक्यात येत नसल्याने अर्ध्या तासानंतर दुसरा पाण्याचा बंब मागवण्यात आला.

जेसीबी मशिनची मागणी

याविषयी माहिती देताना एका फायरमनने सांगितले की, उष्णतेमुळे या ठिकाणी आगीची पुनरावृत्ती होऊ शकते आणि आग पूर्णपणे विझविण्यासाठी आग लागलेला कचरा बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशिनचा उपयोग करण्याची मागणी केली आहे.

या आगीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल अजून प्राप्त झाला नाही. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: ..रुक जाना नहीं तू कहीं हारके! 1104 अर्ज करूनही नोकरी नाही, पदवीधर 'विठोबा' बनला मेकॅनिकचा हेल्पर

'गोव्यात गुंडाराज चालू देणार नाही'; रामा काणकोणकरांच्या न्यायासाठी विजय सरदेसाईंचे आझाद मैदानात आंदोलन

Vasco: वास्कोतील कचरा पाठवणार काकोड्यात! मुरगाव पालिकेचा निर्णय; सरकारला करणार विशेष अनुदानाची विनंती

Omkar Elephant: ‘ओंकार’चा तोरसे, तांबोसेत धुमाकूळ ! लोकांच्या जमावामुळे गोंधळ; कामात अडथळा आणल्यास गुन्हे नोंदवण्याचा इशारा

Goa Crime: घरातून ड्रग्सपुरवठा, 3 दिवस पोलिसांना हुलकावणी, पेडलर 'तेहरान' अखेर फातोर्डा पोलिसांना शरण

SCROLL FOR NEXT