Science Film Festival Dainik Gomantak
गोवा

उद्यापासून गोव्यात विज्ञान चित्रपट महोत्सव

नावीन्यपूर्ण उपक्रम: ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठ्या संख्‍येने घेणार सामावून

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात सातव्या भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सवास मंगळवार दि. 26 एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध चित्रपटांसोबत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहेत. तळागाळातील विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्‍यात मोठ्या प्रमाणात सामावून घेतले जाणार आहे, अशी माहिती गोवा विज्ञान परिषदेचे अध्यक्ष तसेच महोत्सव आयोजन समितीचे सदस्य सुहास गोडसे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विज्ञान व तंत्रज्ञान सचिव डॉ. तारिक थॉमस, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू व विज्ञान चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष प्रा. हरिलाल मेनन, राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे डॉ. सुंदेश उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते मंगळवारी महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. 2016 पासून हा उपक्रम सातत्याने सुरु आहे. मागच्या वर्षी कोरोना काळातही याची सहावी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. यावर्षी शाळा व महाविद्यालये संपूर्णतः सुरू नसल्यामुळे हा उपक्रम थोड्या उशिरा घेतला जात आहे. राज्यातील सर्व भागातून विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होणार आहेत.

‘आझादी का अमृतमहोत्सव’ या संकल्पनेअंतर्गत 15 मार्चपासून महोत्सवापूर्वीच विविध उपक्रम घेण्यात आले आहेत. यामध्ये विविध शाळांमध्ये संशोधकांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. तसेच विज्ञान विषयावरील चित्रपट निर्मितीची कार्यशाळाही संपन्न झाली असून विज्ञान विषयावरील लघुपट स्पर्धाही घेण्यात आली आहे. त्याचे बक्षीस वितरणही महोत्सवात केले जाणार आहे. विज्ञान शिक्षकांसाठी घेण्यात येणाऱ्या कार्यशाळेत राज्यातील 100 शिक्षक सहभागी होणार आहेत. तसेच रोबोटिक्स या विषयावर निवडक 20 शिक्षकांसाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. डिझाईन थिंकिंग, संशोधकांना ओळखा या कार्यशाळाही घेतल्या जाणार आहेत. तीन दिवस विविध वैज्ञानिक उपलब्ध असणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

Rahul Gandhi: 'केवळ रस्त्यावर उतरुन सत्तापालट होत नाही', 'अच्छे दिन'च्या धर्तीवर 2029 साठी राहुल गांधींचा प्लॅन काय? 12 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान

SCROLL FOR NEXT