Goa Education Dainik Gomantak
गोवा

Goa Education: पहिली ते आठवीपर्यंतच्‍या प्रश्‍‍नपत्रिका 'एससीईआरटी'च तयार करणार! परिपत्रक लवकरच जारी

Goa Education Exam Paper Decision: इयत्ता नववी आणि अकरावीच्‍या प्रश्‍‍नपत्रिका विद्यालये तसेच महाविद्यालयांनाच तयार करण्‍याची मुभा गोवा शालान्‍त मंडळाने दिली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: इयत्ता नववी आणि अकरावीच्‍या प्रश्‍‍नपत्रिका विद्यालये तसेच महाविद्यालयांनाच तयार करण्‍याची मुभा गोवा शालान्‍त मंडळाने दिली आहे. परंतु, पहिली ते आठवीपर्यंतच्‍या प्रश्‍‍नपत्रिका मात्र स्‍वत:च तयार करण्‍याचा निर्णय गोवा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) घेतला आहे. त्‍यामुळे पहिली ते आठवीपर्यंतच्‍या विद्यार्थ्यांना ‘एससीईआरटी’मार्फत मिळणाऱ्या प्रश्‍‍नपत्रिकाच सोडवाव्‍या लागणार आहेत.

नववी, अकरावीच्‍‍या प्रश्‍‍नपत्रिका याआधी शालान्‍त मंडळ तयार करीत होते. परंतु, नव्‍या शैक्षणिक धोरणाच्‍या (एनईपी) अनुषंगाने मंडळाने नववी आणि अकरावीच्‍या प्रश्‍‍नपत्रिका तयार करण्‍याची मुभा विद्यालये आणि उच्च माध्‍यमिक विद्यालयांना दिली आहे.

या प्रक्रियेमुळे शिक्षकांचे कसब पणाला लागून, त्‍यांना आपल्‍यातील कला सादर करण्‍याची संधी मिळेल. शिवाय आपले शिक्षकच प्रश्‍‍नपत्रिका तयार करीत असल्‍याने परीक्षांबाबत विद्यार्थ्यांच्‍या मनात भीती राहणार नसल्‍याचा विश्‍‍वास मंडळाला आहे. शिक्षकांनी तयार केलेल्‍या प्रश्‍‍नपत्रिकांमुळे मंडळाकडे प्रश्‍‍नांची बँक तयार होऊन त्‍याचा फायदा भविष्‍यात होणार असल्‍याचा दावाही मंडळाने केला आहे.

दरम्‍यान, या पार्श्वभूमीवर शालान्‍त मंडळाप्रमाणे ‘एससीईआरटी’ही प्रश्‍‍नपत्रिका तयार करण्‍याची जबाबदारी शाळा, विद्यालयांवर सोपवणार का, असा प्रश्‍‍न निर्माण झालेला होता. परंतु, पहिली ते आठवीपर्यंतच्‍या प्रश्‍‍नपत्रिका पुढील काळातही ‘एससीईआरटी’च तयार करणार असल्‍याचे संचालक मेघना शेटगावकर यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले. याबाबतचे परिपत्रक लवकरच जारी करण्‍यात येणार असल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cooch Behar Trophy: गोव्याला मध्य प्रदेशकडून कठीण आव्हान अपेक्षित, उपांत्यपूर्व लढतीत लागणार कस

'कुशावती' सुशासनाची तहान भागवेल? - संपादकीय

Goa GI Tag: गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 5 नवीन उत्पादनांना मिळाले 'GI' मानांक; कृषी समृद्धीचा जागतिक गौरव

Pillion Helmet Rule: आता मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती, रस्ते सुरक्षेसाठी मोठा निर्णय! टप्प्याटप्प्याने होणार अंमलबजावणी

Goa Sealed Club: सील केलेले क्लब पुन्हा सुरू झाल्याने संशय, प्रशासकीय सावळागोंधळ की मिलीभगत? 'अग्निसुरक्षे'चे नियम धाब्यावर

SCROLL FOR NEXT