Goa Third District: गोव्याच्या नकाशावर नवा जिल्हा 'कुशावती', अधिसूचना जारी; 115 गावांचा समावेश

Goa Third District Name: जनगणनेमुळे पुढील दीड वर्ष जिल्‍ह्यांच्या सीमा बदलणे शक्य होणार नसल्याने सरकारने घाईघाईत ‘कुशावती’ हा तिसरा जिल्हा निर्माण करणारी अधिसूचना जारी केली.
Goa Third District
Goa Third DistrictDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: जनगणनेमुळे पुढील दीड वर्ष जिल्‍ह्यांच्या सीमा बदलणे शक्य होणार नसल्याने सरकारने घाईघाईत ‘कुशावती’ हा तिसरा जिल्हा निर्माण करणारी अधिसूचना जारी केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरीत पत्रकारांशी बोलताना यासंदर्भातील घोषणा केली.

सर्वपक्षीय बैठकीत काल यासंदर्भातील कल्पना मुख्यमंत्र्यांनी दिली होती. जनगणना होणार असल्याने ३१ डिसेंबरनंतरच्या दीड वर्षात जिल्ह्यांच्या सीमा न बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता ‘कुशावती’ जिल्ह्याची नोंद नवा जिल्हा म्हणून होणार आहे. त्‍यात ११५ गावांचा समावेश असेल.

जिल्हा निर्मिती हा राज्याचा प्रशासकीय अधिकार असल्याने त्यासाठी संसद किंवा राष्ट्रपतींच्या मंजुरीची आवश्यकता नसते. या नव्या जिल्ह्याचे मुख्यालय केपे येथे असेल असे अधिसूचनेत म्हटले तरी तूर्त प्रशासकीय इमारती, कार्यालये, मनुष्यबळाची व्यवस्था होईपर्यंत मडगाव येथील साल्ढाणा प्रशासकीय संकुलातील सध्याच्या दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातूनच या नव्या जिल्ह्याच्या कारभार चालणार आहे.

समाविष्‍ट गावांची नावे

केपे तालुका : आमोणे, अवेडे, असोल्डे, अडणे, आंबावली, बेंदुर्डे, बार्से, चायफी, कोठंबी, काकोडा, कावरे, कोर्डे, कोर्ला, काझूर, कुडचडे, कुस्मने, दियाव, फातर्पा, गोकुल्डे, होडार, मोरपिर्ला, मोळकपन, मळकर्णे, मायणा, नाकेरी, नागवे, पाडी, पिर्ला, किटल, केडे, केपे, कुसमणे, शिरवई, सुळकर्णे, उंडोर्ना, शेल्डे, शेळवण शिक शेळवण, झानोडे.

सांगे तालुका : आंतोरीं, भाटी, भोमा, काले, कोळंब, कोम्‍प्रोय, कोरंगिणी, कष्‍टी, कोर्टाली, कुर्डी, कुंभारी, डोंगूर, डोंगुर्ली, दुडल, कुर्पे, मावळींगे, मुगूळी, नैगिणी, नेतुर्ली, नुंदे, ओडशेल, पैती, पोर्ती, पोर्ते, रिवण, रुमब्रे, साळावली, सांगे, सांताना, सावर्डे, शिंगणे, तोडू, उगवे, वेर्ले, विचुंद्रे, विलिया, शेल्‍पे.

Goa Third District
Salman Khan Goa Property: सलमान खानच्या गोव्यातील मालमत्तेवर टांगती तलवार; CRZ नियमांच्या उल्लंघनावरुन हायकोर्टात याचिका दाखल!

धारबांदोडा तालुका : आगलोटे, बंडोळी, कमरकोंडा, करंझोळ, कोडली, कुढे, करमळे, धारबांदोडा, मौसल, माशले, पिळर्ण, साकोर्डा, सांगोड, शिगाव, सोनावली, सुर्ला.

काणकोण तालुका : आगोंद, अंजदीव, काणकोण, चावडी, खोला, खोतीगाव, गावडोंगरी, लोलये, नगर्से, पाळोळे, पैंगीण.

कुशावती नाव का?

कुशावती ही गोव्यातील पुरातन भौगोलिक आणि सांस्कृतिक पार्श्‍वभूमी असलेली नदी. इ.स. चौथ्या शतकात येथे चालुक्यांचे राज्य होते आणि त्यांच्या काळात हा भाग भरभराटीला आला होता. सांगे, केपे, काणकोण आणि धारबांदोडा या तालुक्यांमधून ही नदी वाहते. म्‍हणूनच या जिल्ह्याला ‘कुशावती’ नाव देण्यात आल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

Goa Third District
Goa Politics: 'गोव्यातील जनतेच्या हितासाठी ठोस भूमिका घ्या'! LOP युरींचे प्रतिपादन; काँग्रेस आमदारांतर्फे राज्यपालांना निवेदन

जिल्हा न्यायालय व इतर कार्यालये

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे २५ मतदारसंघ आहेत. त्यातील काही मतदारसंघ आता कुशावती जिल्हा पंचायतीत जाणार आहेत. शिवाय प्रत्येक खात्याचा उपसंचालक पातळीवरील अधिकारी बसणारे कार्यालय केपे येथे सुरू करावे लागणार आहे. कुशावती जिल्हा न्यायालयही उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने स्थापन करावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com