Ponda Savitribai Phule Jayanti 2024 Dainik Gomantak
गोवा

Savitribai Phule Jayanti 2024 : सावित्रीबाई फुलेंची जयंती शासकीय स्तरावर साजरी व्हावी : ज्येष्ठ साहित्यिक मिलिंद म्हाडगुत

Savitribai Phule Jayanti 2024: सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सावित्रीबाईच्या स्मृतीना अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन समीरा शेख यांनी केले. गीता शिरसाट यांनी आभार मानले.

गोमन्तक डिजिटल टीम

Savitribai Phule Jayanti 2024 :

फोंडा सावित्रीबाई फुले या महिला शिक्षणाच्या प्रणेत्या असल्यामुळे त्यांची जयंती सरकारी पातळीवर साजरी होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन निवृत्त प्राचार्य तथा ज्येष्ठ साहित्यिक मिलिंद म्हाडगुत यांनी सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान आयोजित सावित्रीबाईंच्या १२७ व्या पुण्यतिथी कार्यक्रमात बोलताना केले.

यावेळी सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानचे संस्थापक मधु नाईक, डॉ.फातिमा मुल्ला, समीरा शेख, सोनाली कांबळी, विवेकानंद वेरेकर, गीता शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते. सध्या देशात महिला शक्तीचा जय घोष सुरू असल्यामुळे ही शक्ती जागृत करणाऱ्या देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाईंना सरकारी पातळीवर स्थान देणे अनिवार्य असल्याचे म्हाडगुत यांनी सांगितले.

याबाबतीत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना फातिमा मुल्ला यांनी सांगितले,की शिक्षणाला वयाचे बंधन नसून महिलांनी वयाचा बाऊ न करता विविध प्रकारचे शिक्षण घ्यावे. सावित्रीबाई या महिलांच्या आदर्श आहेत, असे त्या म्हणाल्या.

मधू नाईक यांनी प्रास्तविकात आता राज्याच्या बाराही तालुक्यात सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानच्या समित्या नेमल्या जातील,असे जाहीर केले. विवेकानंद वेरेकर, सोनाली कांबळी, वृषाली बेतकीकर यांचीही समयोचित भाषणे झाली.

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सावित्रीबाईच्या स्मृतीना अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन समीरा शेख यांनी केले. गीता शिरसाट यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अचानक संकटं येतायेत? राहू-केतूचा अशुभ प्रभाव असू शकतो जबाबदार; वैवाहिक जीवनातील वाद थांबवण्यासाठी शुक्राला करा प्रसन्न

T20 World Cup 2026 Match Fixing: क्रिकेट विश्वात मोठा भूकंप! टी-20 वर्ल्ड कपमध्ये फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी-करप्शन युनिटकडून चौकशी सुरु

Horoscope April 2026: 30 एप्रिलपर्यंत 'नो रिस्क'! ग्रहांची बदलली चाल, मेष राशीचं वाढलं टेन्शन; चुकीच्या निर्णयामुळे अडकू शकता संकटाच्या चक्रव्यूहात

GCA Premier League: धेंपो क्लबची अर्धी मोहीम फत्ते, 'चौगुले'विरुद्ध 646 धावांचा डोंगर; स्नेहलचे द्विशतक, जीवनचे शतक

VIDEO: वैमानिकाची एक चूक अन् 8 प्रवाशांचा खेळ खल्लास, 5 मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं; इंडोनेशियातील बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टर क्रॅश

SCROLL FOR NEXT