ISL Football: जिगरबाज एफसी गोवाची बरोबरी, पिछाडीवरून गतविजेत्या मोहन बागानला 1-1 असे रोखले

FC Goa vs Mohun Bagan Super Giant: एफसी गोवा संघाने फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर जिगरबाज खेळ करत आयएसएल फुटबॉल लढतीत गतविजेत्या मोहन बागान सुपर जायंटला एका गोलच्या पिछाडीवरून १-१ असे गोलबरोबरीत रोखले.
FC Goa vs Mohun Bagan Super Giant
FC Goa vs Mohun Bagan Super GiantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: एफसी गोवा संघाने शनिवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर जिगरबाज खेळ करत इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल लढतीत गतविजेत्या मोहन बागान सुपर जायंटला एका गोलच्या पिछाडीवरून १-१ असे गोलबरोबरीत रोखले. मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ डग-आऊटमध्ये नसताना यजमान संघाने एका गुणाची कमाई केली.

सामन्याच्या ५५व्या मिनिटास ऑस्ट्रेलियन जॅमी मॅकलॅरेन याने मोहन बागानला १-० असे आघाडीवर नेले. एफसी गोवाचा कर्णधार, अनुभवी बचावपटू संदेश झिंगन याची एकाग्रता ढळली व तो चेंडूवर ताबा राखू शकला नाही. त्याचा लाभ उठवत अगदी समोरून मॅकलॅरेन याने गोलरक्षक बॉब जॅकसन राज याचा बचाव भेदला.

FC Goa vs Mohun Bagan Super Giant
Goa Virgal History: नौदल युद्ध ते गोधन रक्षण! वीरगळांवरील शिल्पांतून उलगडतो गोव्याचा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास

एफसी गोवा संघ जास्त काळ पिछाडीवर राहिला नाही. ६७ व्या मिनिटास बदली खेळाडू रॉनी विल्सन याच्या प्रेक्षणीय गोलमुळे यजमान संघाने बरोबरी साधली. उदांता सिंगच्या चालीवर सर्बियन खेळाडू देयान द्राझिच याने रॉनी याला क्रॉस पास दिला. सामन्याच्या ६१व्या मिनिटास मैदानात उतरलेल्या बचावपटूने मोसमातील पहिला आयएसएल गोल नोंदविताना गोलक्षेत्राबाहेरून उंचावरून मारलेला चेंडू गोलरक्षक विशाल कैथ याच्या डोक्यावरून गोलनेटमध्ये घुसला.

सामन्यातील आकडेवारीत पाहता, मोहन बागानचे चेंडूवर ६५ टक्के वर्चस्व राखले. त्यांना पूर्वार्धात एफसी गोवाची बचावफळीतील भक्कम तटबंदी भेदता आली नाही.

संघात फक्त दोघेच परदेशी खेळाडू असूनही परदेशी खेळाडूंसह पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेल्या सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला एफसी गोवाने चांगलेच झुंजविले. सामन्याच्या भरपाई वेळेतील अखेरच्या मिनिटाचे आक्रमण यशस्वी ठरले असते, तर गौरमांगी सिंग यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने घरच्या मैदानावर कदाचित विजयाची नोंद केली असती.

FC Goa vs Mohun Bagan Super Giant
Cricket Betting Goa: आसगाव येथे आयपीएलच्या सट्टेबाजीवर पोलिसांचा छापा, सातजणांना अटक; 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

एका गुणाचा फरक

एफसी गोवाची ही पाचवी बरोबरी ठरली. त्यामुळे त्यांचे आता १२ लढतीतून २० गुण झाले आहेत. विजेतेपद राखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मोहन बागानला दोन गुणांचे नुकसान सहन करावे लागले. त्यांचे तिसऱ्या बरोबरीमुळे १० सामन्यांतून २१ गुण झाले आहेत. ईस्ट बंगाल व जमशेदपूर एफसीचेही प्रत्येकी २१ गुण असून बंगळूर एफसीच्या खाती २० गुण आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com