Crime News: क्रूरतेचा कळस! प्रेमात मिळाला धोका, संतापलेल्या प्रेयसीने ब्लेडने प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट कापला

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून नात्याला काळिमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी एक घटना समोर आली आहे.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून नात्याला काळिमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी एक घटना समोर आली आहे. आपल्या चार वर्षांच्या प्रेमसंबंधांना छेद देऊन प्रियकराने दुसऱ्या तरुणीशी लग्न केल्याचा राग एका विवाहित प्रेयसीला इतका अनावर झाला की, तिने टोकाचे पाऊल उचलले. "शेवटच्या भेटीसाठी" बोलावून या महिलेने धारदार ब्लेडने तरुणाचे गुप्तांग कापून त्याला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

प्रेम, विश्वासघात आणि सूडाचा थरार

मिळालेल्या माहितीनुसार, पाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुजदेई गावातील २० वर्षीय तरुणाचे त्याच्याच नात्यातील एका विवाहित महिलेशी गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ही महिला चार मुलांची आई असून नात्याने या तरुणाची वहिनी लागते. मात्र, ६ मे रोजी या तरुणाने दुसरीकडे लग्न केले. आपल्या प्रियकराने लग्नाद्वारे दिलेला हा 'धोका' सहन न झाल्याने या महिलेच्या डोक्यात सूडाची भावना निर्माण झाली होती.

शेवटच्या भेटीच्या बहाण्याने बोलावले अन्...

शनिवारी या महिलेने कुरसैली गावातील एका शेतात तरुणाला "शेवटचे बोलायचे आहे" असे सांगून भेटीसाठी बोलावले. तरुण भेटीसाठी आला असता, दोघांमध्ये लग्नावरून जोरदार वादावादी झाली. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या महिलेने अचानक जवळ असलेले ब्लेड काढले आणि तरुणावर हल्ला चढवला. काही कळण्याच्या आतच तिने तरुणाचे गुप्तांग कापले. तरुणाच्या वेदनादायक किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला.

Crime News
Goa Virgal History: नौदल युद्ध ते गोधन रक्षण! वीरगळांवरील शिल्पांतून उलगडतो गोव्याचा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास

आरोग्य केंद्रात धाव आणि पोलिसांची कारवाई

घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या तरुणाला तातडीने शाहाबाद येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याचे पाहून त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी महिला फरार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. तक्रार प्राप्त होताच गुन्हा दाखल करून कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com