क्रिकेट विश्वात खळबळ! रोहित शर्मा पाकिस्तानचा कर्णधार? LIVE सामन्यात ब्रॉडकास्टरची मोठी चूक Watch Video

Rohit Sharma Pakistan captain mistake: बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात सध्या मीरपूर येथील शेर-ए-बांग्ला नॅशनल स्टेडियमवर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे.
Rohit Sharma Pakistan captain mistake
Rohit Sharma Pakistan captain mistakeDainik Gomantak
Published on
Updated on

बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात सध्या मीरपूर येथील शेर-ए-बांग्ला नॅशनल स्टेडियमवर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. मात्र, या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (९ मे) मैदानातील खेळापेक्षा टीव्ही स्क्रीनवर दिसलेल्या एका दृश्याने सोशल मीडियावर तुफान चर्चा घडवून आणली. सामन्याचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या ब्रॉडकास्टरकडून झालेली एक तांत्रिक चूक (ब्लंडर) जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या थट्टेचा विषय ठरली आहे.

पाकिस्तानी संघात दिसली संपूर्ण 'टीम इंडिया'

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रेक्षकांना पाकिस्तानची प्लेइंग-११ स्क्रीनवर दाखवण्यात आली, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. पाकिस्तानच्या खेळाडूंच्या नावाऐवजी चक्क भारतीय क्रिकेटपटूंची नावे झळकली. यामध्ये कर्णधार म्हणून रोहित शर्माचे नाव होते, तर उर्वरित संघात शुभमन गिल, तिलक वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंह यांसारख्या भारतीय स्टार्सचा समावेश होता. थोडक्यात सांगायचे तर, पाकिस्तानच्या नावासमोर भारताचा संपूर्ण संघ दाखवण्यात आला होता.

Rohit Sharma Pakistan captain mistake
Cricket Betting Goa: आसगाव येथे आयपीएलच्या सट्टेबाजीवर पोलिसांचा छापा, सातजणांना अटक; 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

ब्रॉडकास्टरचा हा 'ब्लंडर' व्हायरल होताच सोशल मीडियावर चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका युजरने उपरोधाने म्हटले की, "बहुतेक ग्राफिक्स टीमलाही माहित आहे की खरी टीआरपी कोण आणतं!" तर दुसऱ्या एका चाहत्याने गंमतीत लिहिले की, "इथेही रोहित शर्माच कर्णधार आहे आणि विराट कोहलीला बाहेर बसवले आहे." काही लोकांनी ही तांत्रिक चूक असल्याचे म्हटले, तर काहींनी हा भारतीय चाहत्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत फिरकी घेतली.

Rohit Sharma Pakistan captain mistake
Goa Virgal History: नौदल युद्ध ते गोधन रक्षण! वीरगळांवरील शिल्पांतून उलगडतो गोव्याचा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास

मैदानातील स्थिती: बांगलादेशचे पारडे जड

तांत्रिक चुका बाजूला ठेवल्या तर मैदानात बांगलादेशने मजबूत पकड मिळवली आहे. कर्णधार नजमुल हुसैन शांतोच्या १०१ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशने पहिल्या डावात ४१३ धावांचा डोंगर उभा केला. मोमिनुल हक (९१ धावा) आणि मुश्फिकुर रहीम (७१ धावा) यांनीही मोलाचे योगदान दिले. दुसरीकडे, पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम गुडघ्याच्या दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर असल्याने पाक संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार शान मसूदने अजान अवैस आणि अब्दुल्ला फजल या नवोदित खेळाडूंवर विश्वास व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com