Save Mhadei Save Goa movement Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute : म्हादई प्रश्नी निद्रिस्त सरकारला जागे करा

रविवारी सायंकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान मेणबत्ती किंवा पणती पेटवावी

सुशांत कुंकळयेकर

Mahadayi Water Dispute : म्हादई रक्षणा बाबत गोवा सरकार पूर्णपणे झोपलेले असून या निद्रिस्त सरकारला जागे करण्यासाठी रविवारी 12 तारखेला प्रत्येक गोमंतकीयाने आपल्या घरासमोर मेणबत्ती किंवा पणती पेटवावी असे आवाहन म्हादई बचाव मंचच्या सासष्टी विभागाने आज केले आहे.

यावेळी बोलताना सासष्टी विभागाचे निमंत्रक सेराफिन कोता यांनी रविवारी सायंकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान ही मेणबत्ती किंवा पणती पेटवावी जेणेकरून कदाचित या निद्रिस्त सरकारला जाग येऊ शकते.

या निषेधाचे फोटो फेसबूक आणि इस्ट्राग्रामवरून शेअर करा असे आवाहन केले. यावेळी म्हादई बचाव मंचाचे आंदोलक उपस्थित होते.

हे आंदोलन आता सासष्टी तालुक्यात नेले जाणार असल्याचे सूतोवाच यावेळी कोता यांनी केले. म्हादई आटली तर त्याचे दुष्परिणाम दक्षिण गोव्यावरही होणार आहेत. त्यामुळे दूधसागरही आटणार याची कल्पना लोकांना करून देणार आहोत.

यासाठी सासष्टी तालुक्यातील प्रत्येक गावात सभा आयोजित केल्या जाणार असून त्याद्वारे व्यापक जागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जो पर्यंत कर्नाटकचा डीपीआर मागे घेतला जात नाही तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहणार असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT