CM Pramod  Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa: शिरोडा येथे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात अडथळा आणल्याने 7 ‘आरजीं’ना अटक

दैनिक गोमन्तक

पणजी: शिरोडा विधानसभा (Assembly) मतदारसंघात मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्या कार्यक्रमात अडथळा आणल्याप्रकरणी फोंडा (Ponda) पोलिसांनी (Police) काल शनिवारी रात्री उशिरा ‘रेव्ह्युल्युशनरी गोवन्स’ च्या (आरजी) सात कार्यकर्त्यांना अटक केली. मुख्यमंत्री हे या मतदारसंघात दौरा करण्याबरोबरच आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत होते.

शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर यांच्यासह मुख्यमंत्री डॉ. सावंत हे पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याची माहिती फोंडा पोलिसांनी दिली. या घटनेची दखल घेऊन औपचारिक पोलिस तक्रार नोंदवण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी गोंधळ माजवून मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध भादंसंच्या कलम 143 (बेकायदेशीर जमा होणे), 353 (सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणे) व 509(स्त्रीच्या विनम्रतेचा अपमान) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘रेव्ह्युल्युशनरी गोवन्स’च्या एकाही कार्यकर्त्यांनी कोणाचाही अपमान केला नाही किंवा कोणत्याही पोलिसाला स्पर्श केला नाही. हे सर्व तरुण आमचे समर्थक होते आणि कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या ‘खोटारडेपणा’वर प्रश्न विचारण्यासाठी गेले होते. मुख्यमंत्र्यांकडे ते या प्रश्‍नांची उत्तरे मागत होते असे स्पष्टीकरण ‘रेव्ह्युल्युशनरी गोवन्स’चे प्रमुख मनोज परब यांनी स्पष्टीकरण केले आहे.

राज्यातील सरकारचे कामकाज ज्या पद्धतीने सुरू आहे त्याबाबत हे समर्थक तेथे कार्यक्रमाला उपस्थिती लावून नाराजी व्यक्त करत होते, त्यामुळे पोलिसांनी त्यांची केलेली अटक ही बेकायदेशीर व अवास्तव आहे. जेव्हा मुख्यमंत्री डॉ. सावंत हे कार्यक्रमांना उद्देशून सरकारच्या योजना व कामे सांगतात तेव्हा त्यांनी लोकांच्या प्रश्‍नांना उत्तरे देण्यासही त्यांनी तयारी ठेवावी असे परब यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E-Vehicle : ई-वाहन खरेदीकडे ग्राहकांची पाठ; दरमहा ८२४ वाहनांची नोंद

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

Goa And Kokan Today's Live News: जेनिफर ऑलिवेरा यांचे सरपंचपद अबाधित

SSC Result Sanguem : सांगे तालुक्यात सरकारी शाळांची बाजी; दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

Nepal: नेपाळनेही एव्हरेस्ट, MDH मसाल्यावर घातली बंदी; धोकादायक केमिकलबाबत केली कारवाई

SCROLL FOR NEXT