Sattari Waterfall Drowning Case Dainik Gomantak
गोवा

Sattari Waterfall Drowning Case: शाळेच्या सहलीत निष्काळजीपणा भोवला; विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी 4 शिक्षकांसह 2 टूर ऑपरेटरवर गुन्हा दाखल

Sattari Waterfall Youth Drowning Case: गोव्यातील सत्तरी तालुक्यात शाळेच्या सहलीदरम्यान घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने खळबळ उडाली आहे.

Sameer Amunekar

गोव्यातील सत्तरी तालुक्यात शाळेच्या सहलीदरम्यान घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने खळबळ उडाली आहे. तोणीर-काजरेघाट धबधबा परिसरात 11वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत वाळपई पोलिसांनी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत चार शिक्षक आणि दोन टूर ऑपरेटरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना तोणीर-काजरेघाट धबधबा परिसरात नेण्यात आले. हा परिसर वन्यजीव क्षेत्राशी संबंधित असून, तेथे विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यापूर्वी आवश्यक परवानगी घेतली नसल्याची माहिती समोर आलीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योग्य परवानगी आणि आवश्यक सुरक्षा व्यवस्था नसताना विद्यार्थ्यांना अशा धोकादायक ठिकाणी नेण्यात आल्याचा आरोप आहे. याच पार्श्वभूमीवर संबंधित शिक्षक आणि सहलीचे आयोजन करणाऱ्या टूर ऑपरेटरची भूमिका तपासली जात आहे.

या दुर्घटनेनंतर वाळपई पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. प्रकरणात सहभागी असलेल्या दोन टूर ऑपरेटरना अटक करण्यात आली आहे. सहलीच्या नियोजनापासून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपर्यंत त्यांच्या जबाबदारीची चौकशी केली जात आहे.

चार शिक्षकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांवर देखरेख कशी ठेवण्यात आली होती, धबधब्याच्या परिसरात जाण्यापूर्वी कोणती खबरदारी घेण्यात आली होती आणि सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याचा तपास पोलीस करत आहेत.

सहलीच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह

शाळेच्या सहलींचे आयोजन करताना विद्यार्थ्यांची सुरक्षितता सर्वाधिक महत्त्वाची असते. विशेषतः धबधबे, नद्या, जंगल परिसर आणि इतर धोकादायक पर्यटनस्थळांवर विद्यार्थ्यांना घेऊन जाताना संबंधित विभागांची परवानगी, स्थानिक परिस्थितीची माहिती आणि पुरेशी सुरक्षा व्यवस्था आवश्यक ठरते.

मात्र, या प्रकरणात विद्यार्थ्यांना वन्यजीव क्षेत्रात नेण्यापूर्वी आवश्यक परवानगी घेण्यात आली होती का, यावरच प्रश्न उपस्थित झाला आहे. या दुर्घटनेमुळे शाळा प्रशासन, शिक्षक आणि सहलीचे आयोजन करणाऱ्या एजन्सींच्या जबाबदारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT