Savarde Sonal dam project Dainik Gomantak
गोवा

Savarde Sonal Dam: 'धरण प्रकल्प' येणार? सावर्डे- सोनाळवासीय अनभिज्ञ; निसर्ग, ऐतिहासिक स्थळांबद्दल काळजी केली व्यक्त

Savarde Sonal dam project: सत्तरी तालुक्यातील सावर्डे पंचायत क्षेत्रातील सोनाळ परिसरात धरण प्रकल्प येणार असल्याची माहिती जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकरांनी अर्थसंकल्पीय विधानसभेत दिली होती.

Sameer Panditrao

पणजी: सत्तरी तालुक्यातील सावर्डे पंचायत क्षेत्रातील सोनाळ परिसरात धरण प्रकल्प येणार असल्याची माहिती जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकरांनी अर्थसंकल्पीय विधानसभेत दिली होती. मात्र या प्रकल्पाची कोणतीच माहिती सोनाळ ग्रामस्थ वा स्थानिक पंचायतीला देण्यात आलेली नाही.

याबाबत गावातील काही जागृत ग्रामस्थांनी या प्रस्तावित धरण प्रकल्पासंबंधी मागील ग्रामसभेत पंचायत मंडळाकडे विचारणा केली असता ही बाब समोर आली. यावेळी पंच बाळू राणे यांनीही या प्रकल्पासंबंधी कोणतीच कल्पना नसल्याचे सांगितले.

सोनाळ गावातून म्हादई नदी प्रवाहित होते. याच ठिकाणी म्हादईवर ''म्होवाचो गुणो'' हे प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ आहे. तसेच नदीच्या तीरावर शिरगांवच्या लईराई देवीच्या धोंडगणांचा तळ असलेली अनेक वर्षांपासूनचे धार्मिक स्थानही अस्तित्वात आहे.

तसेच नदीच्या दुतर्फा स्थानिकांच्या माडा पोफळीच्या बागा, काजू बागायती उभ्या आहेत. या परिसरात सरकार लोकांना विश्वासात न घेता धरण प्रकल्पाची घोषणा कशी करू शकते, असा प्रश्न ग्रामस्थांना सतावत आहे.

स्थानिकांना विश्वासात न घेता अशा पद्धतीने प्रकल्प लादत असेल तर सरकाराच्या हेतूबाबत संशय निर्माण होतो. त्यामुळे मंत्री विश्वजित राणे यांनी यात लक्ष घालून या प्रकल्पाचे स्वरूप काय आहे याची प्राथमिक माहिती लोकांना द्यावी, अशी मागणी सोनाळ येथील प्रशांत नाईक यांनी केली.

सावर्डे पंचायत जलस्रोत विभागाला लिहिणार पत्र

या प्रस्तावित धरण प्रकल्पाबाबत सावर्डे पंचायत वाळपई जलस्रोत खात्याला पत्र लिहिणार असल्याची माहिती स्थानिक पंच बाळू राणे यांनी दिली. गावात येणाऱ्या प्रकल्पाची जर काहीच माहिती नसेल तर लोक पंचायतीला जबाबदार धरतील व विनाकारण संशयाचे वातावरण तयार होईल. यामुळे मी स्वत: पुढाकार घेऊन पंचायतीच्या माध्यमातून वाळपई जलस्रोत खात्याला पत्र लिहून प्रस्तावित धरण प्रकल्पाची माहिती मागवणार असे पंच बाळू राणे यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs Pak: भारत विरुद्ध पाकिस्तान 'महामुकाबल्या'त Team India ची प्लेइंग 11 कशी असेल? कोणाला डच्चू, कोणाला संधी?

Best Destination For Solo Travel: सोलो ट्रिपसाठी परफेक्ट! महिलांसाठी सुरक्षित मानली जाणारी 'ही' टॉप ठिकाणं, एकदा नक्की भेट द्या

Railway Accident: पत्नी दारूच्या नशेत रेल्वे ट्रकवर बसली, वाचवायला गेलेल्या पतीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू; वेरोड्यातील दुर्घटना

Sal: भेडशीत तिळारी, दोडामार्गात मणेरी नावाने ओळखली जाणारी गोव्यातील शापुरा नदी; सौंदर्यसंपन्न बनलेला 'साळ गाव'

Mapusa Theft: पुन्हा त्याच ठिकाणी चोरी! दिवसाढवळ्या दुचाकी लंपास, म्हापसा बनतंय का चोरट्यांचे राज्य?

SCROLL FOR NEXT